Latest Thane News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याचबरोबरच उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. अशातच भारतीय जनता पक्षही कामाला लागला आह.
मात्र इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी ठरू नये, तसेच बंडाचा झेंडा उभारू नये, यासाठी चिठ्ठीचा नवीन प्रयोग राबविण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून चिठ्ठीच्या माध्यमातून ठाणे विधानसभेत इच्छुक असलेल्या कोणत्या नावाला पसंती दिली. हे आता चिठ्ठी उघडल्यानंतरच समोर येणार आहे. त्यामुळे आगामी ठाणे विधानसभेत बदल घडतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. तर, दुसरीकडे भूमिपुत्रांचादेखील विचार व्हावा, अशी मागणी कार्यकर्ते करत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीही चूक होऊ नये, यासाठी महायुतीने नियोजन सुरू केले आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यातदेखील महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातदेखील महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे, त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.
विद्यमान भाजप आमदार संजय केळकर यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे; परंतु भाजपमध्येच त्यांच्या नावाला काहींचा विरोध आहे. तर, यावेळी भूमिपुत्र आणि सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी द्यावा, असा मतप्रवाहदेखील सध्या पक्षात सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून काही किरकोळ अपवाद वगळता स्थानिक राजकारणात भूमिपुत्रांवर वेळोवेळी अन्याय झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
१९७८ मध्ये ठाणे विधानसभेतून जनसंघाचे गजानन कोळी हे निवडून गेले होते. भाजपकडून भूमिपुत्रांना उमेदवारी दिलेली नाही. रायगड जिल्ह्यात भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही आशेचा किरण दिसू लागला आहे. संजय केळकर हे आधी कोकण पदवीधर आणि नंतर सलग दोन वेळा ठाणे विधानसभेतून निवडून आल्याने यंदा या ठिकाणी भूमिपुत्र असलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी आता पुढे आली आहे.
या मतदारसंघातील महागिरी, राबोडी, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी हे आगरी आणि कोळी समाजाचे गड समजले जातात. या मतदारसंघात काँग्रेसने कांती कोळी यांना मैदानात उतरवले होते.
दुसरीकडे प्रदेश सचिव ॲड. संदीप लेले, सुजय पतकी हेदेखील उमेदवारी मिळावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते. शहर अध्यक्ष संजय वाघुले हे पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे या संधीचा फायदा घेत ठाणे मतदारसंघात मराठा उमेदवाराला लॉटरी लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा या मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
ठाणे विधानसभा हा सध्या भाजपच्या ताब्यात असून या ठिकाणी संजय केळकर हे विद्यमान आमदार आहेत; मात्र या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही दावा करण्यात येत आहे. हा मतदारसंघ भाजपकडून आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे कसून प्रयत्न सुरू आहेत, तर, उबाठा पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. मनसेनेही या मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या मतदारसंघाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.