ठाण्यात फटक्यांमुळे लागल्या सात आगी; दोन दिवसांत २७ आगीच्या घटना

fire
fireFile photo
Updated on

ठाणे : ठाणे शहरातील (thane city) विविध भागांत दिवाळीच्या (Diwali Festival) पहिल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २७ आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या फक्त सात आगीच्या घटनांचा (Fire incidents) समावेश आहे. फटाक्यांमुळे प्रामुख्याने कचराच पेटला (Drainage fire) आहे. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे ठाणे महापालिका (Thane municipal) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

fire
ठाण्यात फटक्यांची आतषबाजी; उच्चभ्रू परिसरात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण

दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात डझनभर घटनांमध्ये आगी लागल्या असून त्या सर्व आगी संध्याकाळनंतर लागल्या आहेत. सहा घटना या फटाक्यांमुळे लागल्या आहेत. यामध्ये पांचपाखाडी, नामदेव वाडीतील मरी गोल्ड बिल्डिंगच्या ११ व्या मजल्यावर फटाक्यांमुळे खिडकीच्या नायलॉन जाळ्याला किरकोळ आग; तर कळवा येथील गणपती विसर्जन घाटाजवळील फटाक्यांमुळे कचऱ्याला आग लागली. घोडबंदर रोड, मानपाड्यात फटाक्यांमुळे एसीच्या बाहेरील युनिटला आग लागली.

वर्तक नगर, पोखरण रोड क्र. १ येथे फटाक्यांमुळे नारळाच्या झाडाला आग लागली. वागळे इस्टेट, रोड नंबर १६ येथील कृषी कार्यालयाजवळील मालवण किनारा पोळीभाजी केंद्राच्या प्लास्टिकच्या ताडपत्रीमध्ये फटाक्यांमुळे किरकोळ आग लागली. याचबरोबर दिवा डम्पिंगसह वसंत विहार येथील जस्मिन टॉवर,च्या १५ व्या मजल्यावरील खोली आणि सह्याद्री हाऊसमधील वॉशिंग मशीनमध्ये तसेच बाळकुम येथे ट्रकच्या ड्रायव्हर केबिनमध्ये किरकोळ आग लागली; तर दुसऱ्या दिवशीही १५ ठिकाणी आग लागली असून त्याही किरकोळ आगी असून एका घटनेत कारने पेट घेतला आहे.

fire
एक्सप्रेसमधून मोबाईल चोराला पोलिसाने रंगेहाथ पकडले

ही घटना राबोडी साकेत मैदान येथे घडली. याचदरम्यान वागळे इस्टेट, जय भवानी मंदिराजवळ फटाक्यांमुळे कचऱ्याला किरकोळ आग लागली होती. एकंदरीत या सर्व घटना किरकोळ स्वरूपातील असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली. या घटनांची माहिती मिळताच तातडीने पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्याच्या नियंत्रण मिळविण्यावर विशेष भर देण्यात आल्याचे आपत्ती विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.