Thane News: विद्यार्थ्यांनी करून दाखवलं; गाव केलं प्लास्टिकमुक्त!

Thane News: ग्रामीण शिक्षण संस्था, कला व विज्ञान महाविद्यालय माजीवाडा ठाणे यांच्या वतीने सात दिवशीय निवासी शिबिराचं आयोजन खोडाळा - जोगलवाडी या ठिकाणी करण्यात आले होते.
Thane News
Thane News
Updated on

Mokhada News:  ठाणे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ महाविद्यालयाचे निवासी शिबिर मंगळवार  12  ते  18  फेब्रुवारी दरम्यान, मोखाड्यातील दत्तक गावं जोगलवाडी येथे संपन्न झाले आहे. या शिबिरामध्ये  50  विद्यार्थी आणि  4  शिक्षकांनी सहभाग घेतला होता. जोगलवाडी येथे प्लास्टिक मुक्त गाव हे अभियान विद्यार्थ्यांनी राबवून गावातील प्लास्टिक कचरा एकत्र करत तो नष्ट करून नष्ट करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.

त्याचप्रमाणे गावात पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेमध्ये अक्षरलेखन शिबिर, स्वसंरक्षण शिबिर आणि विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे अभियान राबविले आहे.

Thane News
Thane News: मुंब्रा विभागातील ३९ जणांची तडकाफडकी बदली

जनजागृती होण्यासाठी शिबिराच्या शेवटच्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात जाऊन प्लास्टिक मुक्त गाव या विषयावर पथनाट्य सादर केले. ग्रामीण शिक्षण संस्था, कला व विज्ञान महाविद्यालय माजीवाडा ठाणे यांच्या वतीने सात दिवशीय निवासी शिबिराचं आयोजन खोडाळा - जोगलवाडी या ठिकाणी करण्यात आले होते.

या निवासी शिबिराच्या अंतर्गत स्वच्छ भारत, सुंदर भारत हा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमांर्तगत जोगलवाडी या ठिकाणी प्लास्टिक मुक्त जोगलवाडी हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उपक्रम राबविला आहे. 

         या शिबिरात मोहीते महाविद्यालयाचे प्रा. तुकाराम रोकडे यांनी ग्रामीण पत्रकारिता : संधी आणि आव्हाने, प्रा. रघुनाथ मोरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर व्याख्यान दिले. तसेच प्रा. माधुरी मोरे, प्रा. प्रवर्तन काशीद आणि प्रा. दीपक कडलग यांनी अनुक्रमे ग्रामीण राजकारणात लोकप्रतिनिधींची भूमिका, आदिवासी भागातील इतिहासाच्या पाऊलखुणा आणि ग्रामीण विकासात स्वयंसेवकांची भूमिका आदी विषयांवर व्याख्याने झाली.

Thane News
Thane News: पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, छंद जोपासावेत

या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांनी सर्वांनी सहभाग घेतला यामध्ये प्राचार्य विलास शेजुळ कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रुकसाना शेख आणि डॉ. आदित्य देसाई, प्रा.भरत जाधव यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला आणि स्वच्छ भारत सुंदर भारत या उपक्रमांतर्गत आज प्लास्टिक मुक्त जोगलवाडी हा उपक्रम मोठ्या हिरवीने राबविला. 

          प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी गावासाठी किती धोकेदायक आहे आणि पर्यावरणाचा त्याचा कसा रास करतो आणि जेणेकरून आपल्याला परिवार पर्यावरणातून मिळणारे जे घटक आहेत ते कसे डिस्टर्ब होतात याविषयी सर्व मार्गदर्शन स्वयंसेवकांनी गावकऱ्यांना पटवून दिले. भविष्यामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा आणि प्लास्टिक वापर हा टाळावा असा संदेश संपूर्ण गावाला स्वयंसेवकांनी दिला आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा रुकसाना शेख, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख प्रा. आदित्य देसाई आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा विलास शेजुळ यांनी प्रत्यक्ष सात दिवस निवासी शिबिरात उपस्थित राहून संपूर्ण हिवाळी श्रम शिबिराचे नियोजन केले होते.

Thane News
Thane News : ठाणे पालिकेचा अजब कारभार! रस्त्यांचा नाही पत्ता; आणि कामाच्या काढल्या निविदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.