पारा घसरला, गारवा पसरला; ठाणेकरांना अंशत: दिलासा

पाच दिवसांपूर्वी ४४ अंश पार गेलेल्या तापमानाचा पारा आता ३९ अंशांवर घसरल्याने वातावरणात पुन्हा गारवा
Thane Temperature Updates
Thane Temperature Updates
Updated on

ठाणे : पाच दिवसांपूर्वी ४४ अंश पार गेलेल्या तापमानाचा पारा आता ३९ अंशांवर घसरल्याने वातावरणात पुन्हा गारवा परतण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळी तापमानाची नोंद २६ ते २८ अंश इतकी होत असून, दुपारी मात्र सूर्य डोक्यावर येईपर्यंत ते ३९ अंशापर्यंत वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पारा चाळीसच्या आत स्थिरावल्यामुळे तसेच दिवसभर तापमान ३१ ते ३६ अंशामध्ये खेळत असल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना अंशत: दिलासा मिळाला आहे. (Thane Temperature Updates)

होळी पेटल्यानंतर साधारण ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते; पण यंदा हवामान बदलामुळे मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उष्णतेच्या लाटेने धडक दिली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार १४ मार्चपासून ठाण्याचा पारा वर चढायला लागला. ४०, ४२, रेकॉर्ड ब्रेक ४३ अंश, तर कधी ४४ अंश पार करून उष्णतेच्या लाटांनी उच्चांक नोंदवला.

वाढत्या गरमीने नागरिक हैराण झाले होते. कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी ठाणेकर दुपारचा प्रवास टाळत होते. त्यामुळे २४ तास वर्दळ असलेले रस्तेही ओसाड पडू लागले. त्यात सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या त्रासात भर पडली होती. दरम्यान, उष्णतेची ही लाट १८ मार्चनंतर ओसरेल, असा अंदाज होता. त्यानुसार थोड्या ‘अंशी’ दिलासा मिळाला आहे.

ठाणे शहरात १९ मार्चला ३९.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. २० मार्चला रविवारी, त्यात आणखी पाच अंशांची घसरण होऊन पारा ३५.२ अंशांवर आला. त्यामुळे थोडी काहिली कमी झाली आहे. सोमवारी २१ मार्चला पुन्हा कमाल तापमान ३९.४ वर पोहोचले. पण हवेतील आर्द्रता २२ ते २९ टक्के असल्याने हिट इंडेक्स ३२ अंशापर्यंत नोंदवले गेले आहे.

अचानक मिळाला सुखद धक्का

ठाणे शहरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता कमाल २८ व किमान २६ अंश तापमानाची नोंद झाली. दुपारी साडेबाराला कमाल ३६.७ व किमान ३३.८ अश तापमानाची नोंद झाली. तर दुपारी दीड व अडीच वाजता कमाल ३९ ते ३९.४ तापमान नोंदवले गेले. एकंदरीत पारा चढाच असला तरी वातावरणात अचानक आलेल्या गारव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने घाम गाळणाऱ्या ठाणेकरांना सुखद धक्का मिळाला आहे.

पक्ष्यांसाठी दाणा- पाणी ठेवा

उष्णतेचा फटका नागरिकांसह पक्ष्यांना देखील बसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे `एचपीसीआय` या संस्थेत उष्माघाताचा फटका बसल्याने तीन पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून, यामध्ये दोन घारी आणि एका ससाणे या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. सुहास राणे यांनी दिली.

दरम्यान, उन्हाळ्याच्या कालावधीत पक्ष्यांसाठी घराच्या गॅलरीत किंवा वृक्षांवर पिण्याच्या पाण्याची व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पक्षी प्रेमींकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()