Thane Crime: टीव्ही पहायला घरी बोलवलं मग केला अत्याचार , ७२ वर्षीय नराधमाला तीन वर्षांची शिक्षा

Latest Mumbai News: शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द भादवी कलम ३७६ (अ) (ब), सह पोक्सो कायदा कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
Thane Crime: टीव्ही पहायला घरी बोलवलं मग केला आत्याचार, ७२ वर्षीय नराधमाला तीन वर्षांची शिक्षा
Thane Crimesakal
Updated on

Thane Latest Update: अल्पवयीन मुलीला टीव्ही पाहण्यास घरात बोलवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ७२ वर्षीय मैनुददीन अजीजउल्ला अन्सारी या नराधमाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश तसेच भिवंडी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन के कारंडे यांनी गुरुवारी दोषी ठरवत, तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील विजय मुंढे यांनी दिली.

Thane Crime: टीव्ही पहायला घरी बोलवलं मग केला आत्याचार, ७२ वर्षीय नराधमाला तीन वर्षांची शिक्षा
Thane News: बारवी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोघेजण गेले वाहून; जिल्हा प्रशासनाकडून शोधकार्य सुरु

    पीडित ०५ वर्षीय मुलगी ही ९ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी आरोपी अन्सारी याने तिला टीव्ही पाहण्यासाठी त्याच्या घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द भादवी कलम ३७६ (अ) (ब), सह पोक्सो कायदा कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane Crime: टीव्ही पहायला घरी बोलवलं मग केला आत्याचार, ७२ वर्षीय नराधमाला तीन वर्षांची शिक्षा
Thane News : आमदार जितेंद्र आव्हाडांना धक्का! शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकासह असंख्य कार्यकर्ते अजितदादा पवार गटात

त्यानुसारच दोषारोप न्यायालयात सादर केल्यावर न्यायाधीश एन के कारंडे यांच्या न्यायालयात हा खटला आला. त्यावेळी सरकारी वकील विजय मुंढे यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून अन्सारी याला दोषी ठरविण्यात आले. तसेच तीन वर्षांचा सश्रम कारावासाबरोबर ५ हजार दंड अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी तपास केला.

Thane Crime: टीव्ही पहायला घरी बोलवलं मग केला आत्याचार, ७२ वर्षीय नराधमाला तीन वर्षांची शिक्षा
Thane: 'त्या' अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी, जिल्हाप्रमुखांची ग्वाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.