Latest Politcal News: साडेसात लाखांच्या रोख रक्कमेचा तपशिल असताना धाक दाखवून एका फुल उत्पादक व्यापाऱ्याकडून ८५ हजार रुपये उकळणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या आचारसंहिता भरारी पथकातील पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पालिकेच्या तिघा कर्मचाऱ्यांसह दोन पोलिसांचा समावेश असून तेरा दिवसांनी हे प्रकरण समोर आले आहे.