Thane Crime: डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! मित्राला मेसेज केला अन् आरोपी फसला

Dombivali Crime: विष्णूनगर पोलिसांनी शिताफीने तपास करत सदर महिलेचा मारेकरी यश विचारे (वय 28) याला अटक केली आहे.
 डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा' केला मेसेज अन्....!
Thane Crime:sakal
Updated on

Crim Detection : 'आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा', असा मॅसेज त्याने मित्राला केला. यामुळे हाच मारेकरी असल्याचा उलगडा पोलिसांना झाला आणि त्याला जेलची हवा खावी लागली.

डोंबिवली येथे एका 65 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. विष्णूनगर पोलिसांनी शिताफीने तपास करत सदर महिलेचा मारेकरी यश विचारे (वय 28) याला अटक केली आहे.

 डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा' केला मेसेज अन्....!
Nashik Crime News : वीज चोरीच्या प्रकरणांत वाढ; 2 दिवसांत 6 गुन्हे दाखल

मित्राला दारु पिण्याचं निमंत्रण देण्याच्या मॅसेजमुळे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना यश मिळालं आहे. पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात वसंत निवास सोसायटीत आशा रायकर (वय 65) या एकट्या रहात होत्या.

आशा रायकर यांच्या घराचं दार बाहेरुन बंद होतं. शेजाऱ्यांनी दार उघडून आत जाऊन पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह घरात पडला होता. त्यांनी तातडीनं ही माहिती पोलिसांना दिली. आशा यांचा मृतदेह हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला.

त्यांच्या गळ्यातील माळ व कानातील कर्णफुले गायब होती. यामुळे विष्णूनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला होता.

 डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा' केला मेसेज अन्....!
Nashik Crime News : वीज चोरीच्या प्रकरणांत वाढ; 2 दिवसांत 6 गुन्हे दाखल

दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वसंत निवास आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी इमारतीमध्ये बाहेरचं कुणी आलं नाही, हे निष्पन्न झालं. या इमारतीत राहणारा यश विचारे हा तरुण संशयास्पद हलचाल करत होता, हे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांनी यशला ताब्यात घेतले. तो काही बोलण्यास तयार नव्हता. यशला दारुचे व्यसन आहे. विष्णूनगर पोलिसांनी यशच्या काही मित्रांना विचारपूस करण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले. त्यापैकी एका मित्राने सांगितले की, यश याने दुपारीच त्याच्या मोबाईलवर मेसेज केले होता. 'आजा दारु पिते है. कल शायद जमा होना पडेंगा', या मेसेजमुळे तोच मारेकरी असल्याचं स्पष्ट झालं.

 डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा' केला मेसेज अन्....!
Nashik Crime News : पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करून छळ!

का केली हत्या?

यशला बेटिंग लोटस 365 या साईटवर ऑनलाईन क्रिकेट जुगार खेळण्याचा नाद होता. त्याच्यावर

बेटिंगमध्ये 60 हजार रुपयाचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याला दारुचं व्यसन असल्यानं मित्रासोबत दारु पार्टी करायची होती. इमारतीच्या लिफ्टपाशी उभा असताना त्याला आशा यांच्या गळ्यात आणि कानातले दागिने दिसले. ते पाहून त्याची नियत फिरली. तो आशा यांच्या घरात गेला.

त्यानं घरामध्ये त्यांची गळा दाबून हत्या केली. कानातील गळयातील दागिने घेऊन बाहेर पडला. त्याने दागिने सोनाराकडे गेले. त्यापैकी गळ्यातील चैन ही सोन्याची होती. तर कानातील रिंग नकली होते. सोन्याचे चेन विकून त्याला 17 हजार रुपये मिळाले. त्यातून त्याने पार्टी केली. यश विचारेला पोलिसांनी अटक केली आहे.

 डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा' केला मेसेज अन्....!
Crime News : वृद्धेला गंडा घालून साडेपाच तोळ्याच्या बांगड्या लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.