Thane Crime: सव्वा महिन्यानंतर चितळसर हद्दीतील दोन जेष्ठांच्या हत्यांचे सत्य आले बाहेर!  

Crime: कंत्राटी वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षकच निघाले आरोपी ; दोन आरोपी अटकेत|२० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी 
thane murder mistery
thane murder misterysakal
Updated on

Thane Crime: नव्या वर्षाच्या प्रारंभीच ४ जानेवारी, २०२४ रोजी  चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोस्ती एम्पेरिया, एमएमआरडीए बिल्डींग नं १, मानपाडा इमारतीत समशेर बहादुर रणबाज सिग(६८) आणि सौ मिना समशेर सिंग(६५) या पतिपत्नींची दुहेरी हत्येची घटना घडलेली होती.

तब्बल सव्वा महिन्यानंतर इमारतीत राहणाऱ्या आरोपी निसार अहमद कुतबुध्दीन शेख (२७) आणि रोहित सुरेश उतेकर(२६) या दोघांनी चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. चितळसर पोलिसांनी दोघा आरोपीना शुक्रवारी(ता-१६) रोजी अटक केली.

त्यांना न्यायालयात नेले असता ठाणे न्यायालयाने २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. चितळसर पोलीस अधिक तपास करीत आहेत. चितळसर पोलिसांनी आरोपीकडून सोन्याच्या बांगडया, तसेच कानातील टॉप्स आणि मोबाईल  असा मुद्देमाल हस्तगत केला. 

thane murder mistery
Beed Crime News : आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर जमावाचा हल्ला; केज शहरातील घटना

   मृतक  समशेर बहादुर रणबाज सिग(६८) आणि सौ मिना समशेर सिंग(६५) दोघे पतिपत्नी असून बी/१४२६, दोस्ती एम्पेरिया, एमएमआरडीए बिल्डींग नं १, मानपाडा, ठाणे येथे दोघेच राहत होते. त्यांचा एक मुलगा सुधीर सिंग(३८) विवाहित असून तो अंबरनाथ येथे राहावयास होता. तो अधूनमधून आई-वडिलांना भेटण्यास येत होता.

घटनेच्या दिवशी ४ जानेवारी, २०२४ रोजी सुधीर आई-वडिलांना दिवसभर फोन करीत होता. प्रतिसाद मिळाला नाही. फोन बंद होते. फोन न उचलल्याने संध्याकाळी ७ वाजता आई-वडिलांच्या घरी आला. तर घर उघडे आढळले.

thane murder mistery
Railway Crime: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाची मुंबईत फसवणूक

घरात आई व वडिल दोन वेगवेगळ्या बेड वर मृत अवस्थेत दिसले मयत आई व वडिल याची जीभ दातामध्ये अडकली होती व ओठावर रक्त साखळले होते. सुधीर याने पोलिसांना माहिती कळवताच चितळसर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

चितळसर पोलिसांची दोन पथक हि सव्वा महिन्यापासून इमारतीचे सीसीटीव्ही, मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास करीत होते. तर पो. हवा.  अभिषेक सावंत पो. शि. शैलेश भोसले स्थानिक लोकांकडून माहिती घेत होते. सीसीटीव्हीत कुणीही बाहेरचा रहिवाशी आढळला नाही.

सीसीटीव्हीत दिसणाऱ्या स्थानिक रहिवाशांची चौकशी केली. त्यात संशयात अडकलेल्या निसार अहमद कुतबुध्दीन शेख आणि रोहीत सुरेश उतेकर याना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दुहेरी हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी दोघांना शुक्रवारी अटक केली. 

thane murder mistery
Mumbai Crime: नालासोपाऱ्यात लव्ह जिहाद प्रकरण, तरुणावर गुन्हा दाखल

  अटक आरोपी निसार अहमद कुतबुध्दीन शेख (२७) हा बिल्डिंग नंबर-२ मध्ये रूम नंबर  १७०५ मध्ये राहत होता. तर आणि रोहीत सुरेश उतेकर,हा त्याच इमारतीच्या १६ व्य माळ्यावर रूम नं १६२८ मध्ये राहत होता.

निसार हा त्याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर आरोपी रोहित उतेकर हा कळवा  रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होता. दोघांनी चोरीच्या उद्देशाने दोघां जेष्ठांचा गाला दाबून हत्या केळ्याची कबुली दिली. तर पोलिसांनी या दोन्ही आरोपीकडून मृतकाच्या चोरीस गेलेल्या सोन्याच्या बांगडया, तसेच कानातील टॉप्स आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.

thane murder mistery
Navi Mumbai Crime: विनापरवाना खैराची तस्करी; दोघे ताब्यात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.