Thane Crime: अंबरनाथमध्ये जादूटोण्याचा प्रकार, नागरिकांमध्ये संभ्रम

Thane Crime: अंबरनाथमध्ये जादूटोण्याचा प्रकार, नागरिकांमध्ये संभ्रम
Thane Crimesakal
Updated on

Ambarnath Crime: बुधवार 8 मे च्या  चैत्र अमावस्येच्या रात्री  जेमतेम 9 वाजण्याच्या  सुमारास एका सुपामध्ये लिंबू, दोरे , दिवे अश्या वस्तू ठेवून व्यक्ती  पसार झाली, रस्त्यात ठेवलेल्या वस्तू पाहून नागरिकांमध्ये  संभ्रम निर्माण होऊन घबराहट पसरली, सर्व प्रकार सीसी कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.  असे कृत्य झाल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी अविनाश सुरसे  यांनी सगळ्या वस्तू जागेवरून उचलून नेल्या आणि वाहत्या पाण्यात सोडून दिल्या.

Thane Crime: अंबरनाथमध्ये जादूटोण्याचा प्रकार, नागरिकांमध्ये संभ्रम
Navi Mumbai Crime: बापानं मुलीवर केला लैंगिक अत्याचार; घटनेनं नवी मुंबईत संतापाची लाट

 अंबरनाथच्या पूर्वेकडील शिवगंगानगरसारख्या गजबजलेल्या परिसरात अशी विचित्र  घटना  घडली. बुधवार 8 मे रोजी चैत्र अमावस्या होती,  शिवगंगानगरला दोन व्यक्ती आल्या त्यांनी आणलेले सूप  रस्त्याच्या मधोमध ठेवले, सुपात लिंबू, दोरे, काही खाद्यपदार्थ आणि दिवे अश्या वस्तू ठेवून अंधाराचा फायदा घेऊन निघून गेले. 

  रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या वस्तू नागरिकांच्या दृष्टीला पडल्या आणि नागरिक जमा झाले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही  जण घाबरून दूर पळू लागले होते. त्याचवेळी संबंधित ठिकाणी आलेल्या वाहन चालकांनी देखील सावधगिरी बाळगत सुपाच्या बाजूने वाहने वळवली. 

Thane Crime: अंबरनाथमध्ये जादूटोण्याचा प्रकार, नागरिकांमध्ये संभ्रम
Crime News: काळ्या जादूच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, ढोंगी बाबाला अटक

 हा अनोखा प्रकार स्थानिक रहिवासी आणि कल्याणच्या शाळेतील  शिक्षक आणि  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.  ठेवलेल्या सर्व  वस्तूंसह  सूप संबंधित ठिकाणावरून उचलले आणि वाहत्या पाण्यात सोडून दिल्याचे  सांगितले. हा सर्व प्रकार सी सी कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

     सुशिक्षित आणि पुढारलेल्या राज्यात आजही असे प्रकार घडतात, हे प्रकार  अयोग्य आहे, अश्या गोष्टींचा निषेध व्यक्त करून   सुपातील सर्व वस्तू विसर्जित केल्या.

अविनाश सुरसे, सचिव, मनसे, अंबरनाथ

Thane Crime: अंबरनाथमध्ये जादूटोण्याचा प्रकार, नागरिकांमध्ये संभ्रम
Navi Mumbai Crime: बापानं मुलीवर केला लैंगिक अत्याचार; घटनेनं नवी मुंबईत संतापाची लाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.