ठाणे : मोटार सायकल चोरीच्या वाढत्या (bike robbery) घटनांचा तपास सुरू असताना, सीसीटीव्ही फुटेजमधील (CCTV Footage) कैद झालेल्या काळ्या रंगाच्या टोपीवरील 'किंग्स' या अवघ्या इंग्रजी अक्षराने मोटार सायकल चोरणाऱ्या दुकलीची चोरी उघडकीस आल्याने ही दुकली सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून यामध्ये एक अल्पवयीन चोरटा (Minor thief) आहे. त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली (Crime Confession) असून त्या चारही गुन्ह्यातील दोन लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ठाणे नगर पोलिसांना (Thane Nagar police) यश आले आहे. तसेच ते सराईत चोरटे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महागिरी येथे राहणारे दिनेश पितांबरे (३९) यांची ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मोटार सायकल चोरीला गेल्याने त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्याचा तपास करताना, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना त्या ठिकाणी एक १८ ते २० वयोगटाचा, सडपातळ बांधा असलेला, डोक्यावर 'किंग्स' असे इंग्रजी अक्षर असलेली काळया रंगाची टोपी घातल्याचे निदर्शनास आले. तसेच हातात कडे सदृश्य वस्तु असलेला मुलगा मोटारसायकल चोरुन घेवुन जात असल्याचे स्पष्ट झाले.
तो ती मोटारसायकल जांभळी नाका मार्गे - तलावपाळी सिग्नल नितीन कंपनी ब्रिज- ज्ञानेश्वरनगर- इंदिरानगर वागळे इस्टेट असा गेल्याने त्यानुसार त्या मार्गावरिल विविध ठिकाणी लावले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो चोरटा ती मोटारसायकल ही इंदिरानगर परिसरात घेवुन गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास करून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने ठाणे नगर, श्रीनगर आणि वागळे इस्टेट या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे साथीदाराच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार रुपये किंमतीच्या ०४ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस हवालदार गणेश पोळ, पोलीस नाईक विक्रम शिंदे, तानाजी अंबुरे, गणेश पवळे, सुनिल गांगुर्डे, पोलीस शिपाई सचिन चव्हाण या पथकाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.