ठाणे-दिव्याची 'ही' मार्गिका पूर्ण होण्यासाठी नवीन तारीख; एमआरव्हीसीचा दावा

डिसेंबर 2021 रोजीपर्यंत मार्ग पूर्ण होण्याचा एमआरव्हीसीचा दावा
Thane railway station
Thane railway station sakal media
Updated on

मुंबई : मागील 13 वर्षांपासून ठाणे-दिवा (thane-diva) पाचवी, सहावी मार्गिकेचा (fifth-sixth railway line project) प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, या प्रकल्पाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी (technical errors) येत असल्याने प्रकल्पाची अंतिम मुदत (final tenure) वाढविली जात आहे. आता, डिसेंबर (December) 2021 पर्यंत हा मार्ग खुला होण्याचा दावा एमआरव्हीसीने (MRVC) केला आहे.

Thane railway station
शिवसेनेच्या 'या' माजी मंत्र्यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून चिपळूण रुग्णालयाला मदत

उपनगरीय मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी, एक्सप्रेसला स्वतंत्र मार्ग मिळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) 2 मध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रकल्पांमध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. सध्या ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन एमआरव्हीसीचे आहे.

ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिकेच्या प्रकल्पाला 2008 साली मंजुरी मिळाली. मात्र निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च 2021 मध्ये वेग धरला. मुंब्रा येथे खाडीवर पुल बसविला आहे. आता दाेन्ही दिशेला रुळांची जाेडणी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 48 किंवा 72 तासांचा असेल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Thane railway station
यिनच्या अधिवेशनाचे फलित; यिनचे मंत्रिमंडळ भेटले राज्याच्या मंत्रिमंडळाला

हा मार्ग सुमारे 9.8 किमीचा असून 2019 पर्यंत ही मार्गिका पूर्ण होणार होता. मात्र, आता डिसेंबर 2021 पर्यंतही मार्गिका पूर्ण  होणार असा दावा करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याची आधीची अंतिम मुदत डिसेंबर 2017 ची होती. दरम्यान, ठाणे ते दिव्यातील पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर या पट्ट्यात सुमारे जादा 100 फेऱ्या चालविल्या जाऊ शकतात, असा दावा केला आहे. या ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 140 कोटी रुपये होता. मात्र प्रकल्प रखडल्याने सुमारे 502 कोटी रुपये खर्च लागला आहे.

सध्या कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्याच्या गाड्यांची वाहतुकीस सोयीचे होईल. ठाणे ते दिवा दरम्यान उभारण्यात येत असलेल्या पाचवी-सहावी मार्गिका ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिम्या मार्गाला जोडून आले. या प्रकल्पातील मुंब्राजवळ दिड किलोमीटरचा उन्नत मार्ग, रुळांसह अन्य तांत्रिक कामे सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.