ठाणे : हवा आणि ध्वनिप्रदूषण (noise pollution) होऊ नये यासाठी दिवाळी (Diwali Festival) साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन सरकारी यंत्रणा (Government) आणि सामाजिक संस्थांच्या (social organization) वतीने करण्यात आले होते. मात्र यंदाच्या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी उच्चभ्रू परिसरात नियमांची पायमल्ली (rule breaks) केल्याचे चित्र होते. या परिसरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते १०.३० या दोन तासांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ध्वनिप्रदूषण वाढले असल्याचे डॉ. महेश बेडेकर (dr mahesh bedekar) यांनी केलेल्या आवाजांच्या नोंदीमधून समोर आले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सहापासून सुरू झालेल्या फटाक्यांची आतषबाजी मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती. पाचपाखाडी आणि हिरानंदानी मेडोज परिसरातील रस्त्यांवर आवाजाची तीव्रता १०० ते १०५ डेसिबल इतकी प्रचंड वाढली होती. याशिवाय राम मारुती रोड, पाचपाखाडी, गोखले रोड, ठाणे पूर्व या भागातही आवाजाची पातळी ही ९० ते ९५ डेसिबल इतकी नोंदवण्यात आली आहे. ही आवाजाची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेल्या आवाजाच्या नोंदीवरून समोर आले आहे.
दिवाळीतील शोभिवंत फटाक्यांची संख्या वर्षागणिक वाढतच असून त्यामुळे हवेच्या प्रदूषणातही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. दिवाळीत ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेवरही काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरणपूरक साजरी करून यंदाची दिवाळीची तेजोमय साजरी करण्याचे आवाहन जिल्हा व महापलिका प्रशासनाकडून केले होते. मात्र या आवाहनाला उच्चभ्रू परिसरातील नागरिकांनीच ठेंगा दाखवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.