ठाणे : ठाणे महापलिका निवडणुकीचे (Thane Municipal election) सर्वच इच्छुकांना वेध लागले आहेत. त्यात राज्य सरकारने (mva government) अध्यादेश जरी करीत पालिकेला कच्चा प्रारूप आरखडा ३० नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात ४६ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन; तर एका प्रभागात चार नगरसेवक (corporator) असणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात प्रभागरचना (ward division) स्पष्ट होणार असून, दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ठाणे पालिकेच्या निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरकारने अध्यादेश जारी करून ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात सुरुवातीला १ सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेतली जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार पालिकेच्या वतीने प्रभागांची रचना हाती घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा यात बदल झाला आणि तीन सदस्यीय पद्धतीने प्रभागांची रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहीत धरावी असे सांगण्यात आले. त्यानुसार पालिकेने नव्याने प्रभागांची रचना आखण्यास सुरुवात केली आहे.
२०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत २०२१ ची जनगणना गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार आता १४२ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार असून ४७ प्रभाग असणार असल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु यामध्ये ४६ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक; तर एका प्रभागात चार नगरसेवक असे मिळून १४२ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. दिवाळीनंतर पालिकेच्या माध्यमातून कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, या नव्या समीकरणामुळे प्रत्येक वॉर्ड हा आता ३५ ते ३७ हजार ते ४० हजार पर्यंतचा असणार असल्याचे बोलले जात आहे. वाढीव लोकसंख्येनुसार घोडबंदर आणि दिव्यात प्रभाग वाढण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.