Mumbai-Thane Rain : मुंबईत मुसळधार! ठाण्यात चालकाचा आगाऊपणा; गाडी अडकली

पाणी वाहणाऱ्या लेनमधून एका चालकाने गाडी घातल्याने तो अडकून पडला आहे.
Mumbai-Thane Rain
Mumbai-Thane RainSakal
Updated on

ठाणे : राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नद्यांना पूर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर या पुरामुळे ठाण्यातील घोडबंदर रोड पूर्णपणे बंद झाला आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तर येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर व्हिडिओ हा कालचा (बुधवार ता.२६) असून यामध्ये रस्त्याच्या एका लेनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे. त्यामधील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे. ठाणे शहरातील हा ठाणे-घोडबंदर रोड असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या वाहनांचीसुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पाणी वाहणाऱ्या लेनमधून एका चारचाकी कार चालकाचा आगाऊपणा नडला असून पुराच्या पाण्यात गाडी घातल्याने तो अडकून पडला आहे.

Mumbai-Thane Rain
पहावे ते नवलच! चक्क लालपरीला फुटले पंख; छप्पर उडालेल्या एसटी बसचा Video Viral

मुंबईसह उपनगरात आज मुसळधार

आज मुंबईच्या अंधेरी, नरीमन पाँईंट. दादर, मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, किंग सर्कल या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. तर परळ भागातील इमारतींवर धुक्याची चादर पसरली आहे.

राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस

नागपूर, वर्धा, बुलढाणा, अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तर अनेक नद्यांना पूर आल्यामुळे वर्धा, यवतमाळ, अकोला बुलढाण्यामधील अनेक शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.