Thane Lake's News : ठाण्यातील १५ तलावांचे होणार संवर्धन ; केंद्र सरकार घेणार पुढाकार

thane lake
thane lake sakal
Updated on

Thane Lake's News : तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. अशावेळी या तलावांचे संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काही तलावांचे संवर्धन करण्याचे काम केले जात आहे.

आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत दोन योजनेअंतर्गत एकूण 15 तलावांच्या संवर्धन आणि शुशोभीकरणाच्या कामांच्या निविदांना कार्यादेश देण्यात आले आहेत.

thane lake
Mumbai Health News : मुंबईकरांनो डोळ्यांची घ्या काळजी ; डोळ्यांच्या संसर्गाचे आठवड्याभरात बाराशेहून अधिक रुग्ण

काही तलावांच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील तलावांची सर्व कामे सर्वोत्तम दर्जाची होतील याकडे कटाक्ष असावा असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत

thane lake
Kalyan News : कल्याणमधील शिवाजी चौकातील वाहतुकीत बदल !

या 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ५३.३६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी प्रत्येकी 25 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि 25 टक्के राज्य सरकार देणार आहे. तर उर्वरित ५० टक्के निधी महानगरपालिकेचा असणार आहे.

thane lake
Thane News : एनसीसीच्या लिडरकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

या कामांच्या कालावधी एक वर्षाचा असून जून 2024 पर्यंत सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. या कामांतर्गत तलावाला संरक्षक भिंत, बैठक व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, आदी कामांसह जलशुद्धीकरण व्यवस्था सीसीटीव्ही ध्वनी यंत्रणा यांचा समावेश करण्यात येणार आहे

thane lake
Mumbai : हनुमान चालीसा लोकसभेत घुमली,शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली; डोंबिवलीत शिवसेनेची बॅनरबाजी...

या तलावांच होणार सुशाभाकरण

तुर्फेपाडा, खारीगाव, हरियाली, शिवाजीनगर- कळवा, कौसा, कोलशेत, दातिवली, देसाई, ब्रह्माळा, आंबे-घोसाळे, कचराळी, रायलादेवी, कमल, खिडकाळी, जोगिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()