Eknath Shinde: शिंदेंसमोर का नाही टिकली विचारेंची ताकद? काय आहेत महत्वाची कारणं?

Thane Constituency Lok Sabha Election Result: ठाण्यात ठाकरे गटाची उरलेली एकमेव संविधानिक ताकदही संपुष्टात आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे
 शिंदेंसमोर का नाही टिकली विचारेंची ताकद? काय आहेत महत्वाची कारणं?
Eknath Shindesakal
Updated on

Eknath Shinde: शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण गेल्या ३० वर्षांपासूनचे आहे.यामुळे शिवसेना फुटीनंतर या ठिकाणी कोण बाजी मारत याकेडे संपुर्ण देशाच लक्ष होत.

या ठिकाणी नरेश म्हस्केंनी बाजी मारली त्यांनी ठाण्यातून सलग दोन वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन विचारे यांचा पराभव केला. या पराभवामुळे आता ठाण्यात ठाकरे गटाची उरलेली एकमेव संविधानिक ताकदही संपुष्टात आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे.

 शिंदेंसमोर का नाही टिकली विचारेंची ताकद? काय आहेत महत्वाची कारणं?
Eknath Shinde: शहाजी बापू पाटील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

का झाला विचारेचा पराभव?

वास्तविक राजन विचारे यांचा विजय निश्चित मानला जात होता. ग्राऊंड रिपोर्टला दहापैकी नऊ लोक विचारे यांच्या नावाला पसंती देत असल्याचे पाहण्यात आले. पण या पसंतीचे रुपांतर मतांमध्ये करण्यात विचारे यांना अपयश आल्याचे दिसते.

ठाणे हा शिवसेनेचा गड असला तरी भाजप किंवा संघ विचारी मतदारांचा मतदासंघ आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला त्यामुळे येथून सर्वाधिक मते म्हस्के यांच्या पारड्यात पडली. ठाणे शहरात संघविचारी मतदार असल्याने नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मते म्हस्के यांच्या ओंजळीत पडल्याचे दिसते.

 शिंदेंसमोर का नाही टिकली विचारेंची ताकद? काय आहेत महत्वाची कारणं?
Thane Loksabha Result: शिंदेनी बालेकिल्ला ठेवला शाबूत; नरेश म्हस्केंना विचारेंचा केला दणदणीत पराभव!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद असे पाठबळ घेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नरेश म्हस्के यांना अखेर महापालिकेतून थेट संसदभवनाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. नगरसेवक, महापौर ते खासदार असा त्यांचा प्रवास केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कम साथ असल्यामुळेच सुकर झाल्याची चर्चा आहे.

ठाण्यात उमेदवारीवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू होती. शेवटच्या क्षणापर्यंत डझनभर नावांची चर्चा झाली. नरेश म्हस्के यांनी त्यासर्वांमध्ये बाजी मारली. वास्तविक त्यांचे नाव आयत्यावेळी जाहिर झाले असले तरी त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी सुरुवातीलाच फिल्डींग लावून त्या दिशेने तयारी सुरू केली होती. याची पहिली झलक महायुतीच्या पहिल्या मेळयात त्यांनी शिवसैनिक व आपला स्वताचा उल्लेख नमो सैनिक असा केला तेव्हाच मिळाली होती.

उमेदवारी जाहिर झाल्यावर त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. बचत गट, महिला आघाडी, भाजप कार्यकर्ता मेळावा, महायुती मेळावा घेतला. कळवा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा झालेल्या एकमेव जाहिर मेळावा असो वा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कार्यकत्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो नरेश म्हस्के यांनी प्रचाराचे टप्पे भरून काढले.

वास्तविक नरेश म्हस्के यांचा विजय झाला असला तरी त्यांच्याच म्हणण्यानुसार हा विजय नमो सैनिकाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कम सर्वार्थाने भक्कम साथ नरेश म्हस्के यांना मिळाली. शिंदे यांनी म्हस्के साठी रोड शोही घेतले. रस्त्यावरील मिरवणुकीत शामिल झाले. उमेदवार कोण हे पाहू नका, माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे, ध्यानात ठेवा अशी ‘समजूत’ त्यांनी काढली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्तेही चार्ज होत असे. त्यामुळे खासदार म्हणून नरेश म्हस्के विजयी झाले असले तरी खरा विजय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचाच झाला असे म्हणण्यास हरकत नाही.

 शिंदेंसमोर का नाही टिकली विचारेंची ताकद? काय आहेत महत्वाची कारणं?
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.