Varun Sardesai : मतदार भाजपला नक्कीच धडा शिकवणार

देशात लोकशाही जवळपास संपत आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात जो कोणी विरोधी पक्षाचा नेता आवाज उठवतो. त्याच्या मागे ईडी, सीबीआय अशा प्रकारची तपास यंत्रणा लागते ते उघड झाले आहे.
Varun Sardesai
Varun Sardesaisakal
Updated on

ठाणे - भाजपने मतदारांना गृहीत धरले आहे, प्रामुख्याने जैन, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाला. जैन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि उत्तर भारतीयांना मारणाऱ्या मनसेला भाजपने सोबत घेतले आहे, याचा धडा मतदार नक्कीच शिकवतील असे, प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.

गुरुवारी २१ मार्च रोजी सायंकाळी राम गणेश गडकरी रंगायतन, येथे ठाणे लोकसभा युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी बोलताना हे प्रतिपादन केले.

देशात लोकशाही जवळपास संपत आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात जो कोणी विरोधी पक्षाचा नेता आवाज उठवतो. त्याच्या मागे ईडी, सीबीआय अशा प्रकारची तपास यंत्रणा लागते ते उघड झाले आहे. असे वक्तव्य युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी गुरुवारी ठाण्यात बोलताना केले. अरविंद केजरीवाल अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत.

ज्यांनी कमी वेळात दोन राज्य जिंकले. अशा नेत्यांना अटक होते तेव्हा भाजप किती घाबरली असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाडाव करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांनी रिंगणात उतरावे, असे प्रयन्त सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आल्यास कुठेही लोकसभेची निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे देखील सरदेसाई यावेळी म्हणाले.

महायुतीमध्ये मनसेच्या प्रवेशाबाबत बोलताना सरदेसाई म्हणाले, भाजपने मतदारांना गृहीत धरले आहे. प्रामुख्याने जैन, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाला. जैन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि उत्तर भारतीयांना मारणाऱ्या मनसेला भाजपने सोबत घेतले आहे, याचा धडा मतदार नक्कीच शिकवतील. असे सरदेसाई म्हणाले. एकटे उद्धव ठाकरे भाजप पासून लांब झाल्यानंतर त्यांची कमी भरण्याकरता हा भाजपचा खाटोताप सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.