Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश

Thane Rain : नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे
Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश
Updated on

Ayukta Saurabh Rao: ठाणे पालिका हद्दीत असणाऱ्या अतोधोकादाय्क इमारती पावसाळ्यात कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असते. हि बाब लक्षात घेवून ठाणे पालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडण्यात याव्यात. तसेच, रहिवाशांच्या जिविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या इमारती लगेच रिकाम्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

तसेच अतिधोकादायक (सी वन) आणि धोकादायक (सी टू ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश
Thane News: प्रगतशील शेतकरी गजानन विशे यांचे निधन

मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना, त्यापाठोपाठ ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून येत असलेल्या तक्रारी आणि सूचना तसेच, जिल्ह्याच्या पालकसचिव सुजाता सौनिक यांनी गुरूवारी आढावा बैठकीत दिलेले निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची शुक्रवारी बैठक घेतली.

या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (अतिक्रमण आणि आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मनीष जोशी, सचिन पवार, तुषार पवार, दिनेश तायडे, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.

Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश
Thane Loksabha: ठाकरेंचा पराभव करत शिंदेंनी शिवसेनेचा बालेकिल्ला कसा राखला?

महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी वन वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारती व्याप्त आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी - २७, माजिवडा - ०१, उथळसर - ०३, कळवा - ०२, मुंब्रा - ०४ अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींची पाणी, वीज आणि मलनिःसारण जोडणी ताबडतोब तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये, नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असेही आयुक्त राव म्हणाले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल, हे पाहावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत.

Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश
Thane loksabha Election Result : मुख्यमंत्र्यांनी गड राखला

दरम्यान, सर्व ठिकाणी खाडी मुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणे वरचेवर पाहणी करून सुस्थिती राहतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच, रस्त्यावर साचणारे पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे, किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

१४ ठिकाणी पंप व्यवस्था

पाणी साठणाऱ्या सखल भागातील १४ मोक्याच्या ठिकाणी ६३ पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच, स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावे. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावे. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणे शक्य होईल. पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या पंपासोबत, मेगाफोन, टॉर्च, दोरखंड या गोष्टी उपलब्ध ठेवाव्यात. तसेच, पंप ऑपरेटर जागेवर कायम उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश
Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

२४ तासात खड्डा बुजवा

महापालिका हद्दीतील कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडला तर तो २४ तासांच्या आत भरला गेला पाहिजे. तसेच, पावसामुळे झाडांची पडझड झाली तर त्या फांद्या, पालापाचोळा २४ तासांच्या आत उचलला गेला पाहिजे. यात कोणतीही कुचराई नको, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

ती होर्डिंग तत्काळ उतरवा

ज्या होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र अजूनही आलेले नाही अशी २५ होर्डिंग ताबडतोब काढून टाकावीत. तसेच, मंजूर आकारमानापेक्षा मोठी असलेली ५३ होर्डिंगही ताबडतोब काढण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.

Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश
Thane Loksabha Election : देवेंद्र फडणवीस नाराजांची मनधरणी करणार कि कानमंत्र देणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.