ठाणे: ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेने एकापाठोपाठ एक लसीचे (vaccination) तीन डोस दिल्याचा दावा केल्याची घटना ताजी असतानाच ठाणे महापालिकेचा (TMC) एक नवीन प्रताप समोर आला आहे. एका ५४ वर्षीय व्यक्तीने जिवंतपणीच ठाणे महापालिकेने आपले मृत्यूचे प्रमाणपत्र तयार केल्याचा दावा केला आहे. (Thane man receives call from civic body to collect his death certificate)
'चंद्रशेखर देसाई हे ठाणे मानपाडा भागामध्ये राहतात. ऑगस्ट २०२०मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. घरातच उपचार घेऊन ते कोरोनामधून बरे झाले. घरातच क्वारंटाइनमध्ये असताना, प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना एक फोन कॉल आला होता.
चंद्रशेखर देसाई हे पेशाने शिक्षक असून ते घाटकोपर येथील शाळेत शिकवतात. एका महिलेने अलीकडे आपल्याला फोन केला होता. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असल्याचे या महिलेने सांगितले होते. चंद्रशेखर देसाई यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी आपण फोन कॉल केल्याचे त्या महिलेने सांगितले.
"फोन करणाऱ्या महिलेने ठाणे महापालिकेला चंद्रशेखर देसाई यांच्या नावाने मृत्यूचे प्रमाणपत्र जारी करायचे आहे असे सांगितले. जेव्हा मी तिला सांगितले की, तुम्ही चंद्रशेखर देसाई यांच्याबरोबरच बोलत आहात, तेव्हा तिला धक्का बसला. कुटुंबातील अन्य व्यक्तीचा कोविडने मृत्यू झाला आहे की बाधित होते का? अशी तिने विचारणा केली. त्यानंतर तिने फोन ठेवून दिला" असे चंद्रशेखर देसाई यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
या फोन कॉलनंतर देसाई तक्रार करण्यासाठी टीएमसीच्या कोविड वॉररुममध्ये गेले. "मी त्यांना कारण विचारलं. पण ते स्वत:ची चूक मान्य करायला तयार नव्हते. आयसीएमआरच्या यादीत नाव आहे, असे ते सांगत होते. पण माझा प्रश्न आहे की, महापालिकेने यादी पाठवलीच नाही, तर ICMR च्या यादीत नाव कसे येईल? आता त्यांनी मला चूक सुधारण्याचे आश्वासन दिले आहे" असे देसाई म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.