marziya pathan
marziya pathansakal

Thane News : मर्जिया पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

सामाजिक, सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या अन् नागरी समस्यांच्या निपटाऱ्यासाठी लढणाऱ्या मर्झिया शानू पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
Published on

ठाणे - गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या अन् नागरी समस्यांच्या निपटाऱ्यासाठी लढणाऱ्या मर्झिया शानू पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण, शमीम खान हे देखील उपस्थित होते.

Loading content, please wait...