ठाणे महापालिकेकडून शहरातील तब्बल 20 क्लिनिक सीलबंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?

doctor
doctor
Updated on

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. राज्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. राज्यासह मुंबई, ठाण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. तसंच वाढत्या रुग्णांसह मृतांची संख्याही झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबई बाहेरील मुंबई महानगर प्रदेशातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता राज्य सरकारसाठी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच ठाणे महापालिकेकडून शहरातील 20 क्लिनिक सील करण्यात आलेत. 

कोविड-19 च्या रूग्णांची नोंद महापालिकेकडे न केल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेने बुधवारी आणि गुरुवारी 20 सामान्य चिकित्सक (general practioners) क्लिनिक सील केलेत. नवीन पालिका आयुक्तांनी ठाण्यात पदभार स्वीकारल्यानंतर 24 तासांच्या आत ही कारवाई केली आहे. 

मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या सात महानगरपालिकांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढत आहेत. अशातच प्रशासन या आकड्यांवर वेगाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ठाणे, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या चार महानगरपालिकांच्या आयुक्तांची मंगळवारी बदली करण्यात आली. तर गुरुवारी संध्याकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीवर स्थगिती आणण्यात आली. 

उपायुक्त संदीप मालवी म्हणाले की, संशयित कोरोना रुग्णांची प्रकरणे ओळखणं आणि त्यांना आयसोलेशन करणं या महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करण्यासाठी मनपाने त्यांच्याशी अनेकदा बैठक घेतल्या. मात्र त्यानंतरही जीपी सहकार्य करत नव्हते. सीलबंद क्लिनिकवर टीएमसीची नोटीस चिकटविण्यात आली आहे. संशयित कोविड-19च्या प्रकरणांची तपासणी करण्यात सहभागी होण्यासाठी महापालिकेनं अनेकदा संबंधित डॉक्टरांना विनंती करूनही काही क्लिनिक बंद ठेवण्यात आली होती. 20 क्लिनिकवर महाराष्ट्र कोविड-19 रेग्युलेशन 2020 आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.