डोंबिवली - सर्वाधिक लसीकरणात ठाणे महापालिका (thane municipal) आघाडीवर असली तरी, याच महापालिकेचा भाग असलेल्या दिवा शहरातील (diva city) लाखो नागरिक आजही लसीकरणापासून (corona vaccination) वंचित आहेत. दिव्यात सध्या एकच लसीकरण केंद्र (vaccination center) असून या केंद्राची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी भाजपाच्य ( bjp) वतीने करण्यात आली आहे. गुरुवारी या मागणीसाठी आंदोलन (strike) होणार तोच शिवसेना (shivsena) नगरसेवक महापौरांना भेटून आले व एक केंद्र सुरू करण्याची मंजुरी घेऊन आले. लसीपासून सर्वसामान्य नागरिक वंचित असताना दिव्यात केंद्र संख्या वाढीवरून सेना भाजपात मात्र चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळते.
दिवा शहराची लोकसंख्या 5 ते 6 लाखाच्या आसपास असून आत्तापर्यंत केवळ 5 ते 6 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना निर्बंधक लसीकरण मोहीम पालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली मात्र दिवा शहरात एकही लसीकरण केंद्र नव्हते. शीळ येथील आरोग्य केंद्रात जाऊन नागरिकांना लस घ्यावी लागत होती. शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर एस एम जी विद्यामंदिर येथे लसीकरण केंद सुरू केले गेले. मात्र आठवड्यातील दोन कधी तीन दिवस फक्त लस उपलब्ध होत असून आज लाखो दिवेकर लसीपासून वंचित आहेत.
दिवा वासियांच्या मागणीकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व ठाणे शहराच्या तुलनेत सुविधा पुरवित असतांना दिवा शहराप्रती केला जाणारा दुजाभाव याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी दिवा विभागातर्फे गुरुवारी दिवा प्रभाग समिती कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, जिल्हा सरचिटणीस मनोज सुखदरे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील, मंडळ अध्यक्ष आदेश भगत, रेश्मा पवार, सचिन भोईर, रोशन भगत, विजय भोईर यांसह अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांना यावेळी निवेदन दिले असता त्यांनी
महापौरांनी कालच दिवा विभागात आणखी एक नवीन लसीकरण केंद्राला मंजूर दिली आहे. तूमचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. फिरते लसीकरण केंद्र म्हणून असणाऱ्या बसेस किंवा मुख्य ठिकाणी एकदिवसीय लसीकरणाच्या कॅम्प आयोजित केले जातील असे सांगितले. दिवा शहराला कायम दुजाभाव दिला जातो. दिव्यात एकही लसीकरण केंद्र नव्हते याविषयी आवाज उठविल्यानंतर एक केंद्र सुरू करण्यात आले. विभागानुसार लसीकरण वाढवा अशी मागणी आहे पण यांची मानसिकता नाही. आम्ही आवाज उठविल्यावर शिवसेना नगरसेवक महापौरांना भेटतात व निवेदन देतात. 5 महिने ते झोपले होते का? त्यातही त्यांच्याच ओळखीच्या कार्यकर्ते नागरिकांना लस मिळते असा आरोप जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी शिवसेनेवर केला.
यावर नगरसेवक तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी म्हणाले, दिव्यात सुरवातीला एकही केंद्र नव्हते. नागरिकांना शीळ आरोग्य केंद्रात जावे लागत होते. नागरिकांना होणारा त्रास पहाता एसएमजी शाळेत केंद्र सुरू करण्यात आले. महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेण्यात आली असून गणेशपाडा येथील गणेश विद्यामंदिरात लस उपलब्ध होताच सुरू करण्यात येईल. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खोटे बोला ही भाजपची भूमिका आहे म्हणून ते खोटे बोलतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.