Thane News : ठाण्यात पब, बारमध्ये पहाटेपर्यंत हैदोस! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कारवाईची मागणी
ठाणे, ता. २८ : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातानंतर देशभरात या दुर्घटनेची चर्चा होतेय. त्यात आता ठाण्यातील घोडबंदर, येऊर, कोलशेत, टिकुजिनीवाडी, बाळकुम आणि कशेळी आदी भागात पहाटेपर्यंत राजरोसपणे अनाधिकृत पब, बार, हुक्का पार्लर सुरु असतात. या प्रकरणात पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांनी लक्ष घालून यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
पुण्यातील बार व पब्ज मधून मद्यपान केल्यानंतर भीषण अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच आता त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यातही घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कशेळी खाडीकिनारी धाबे राजरोसपणे, पहाटेपर्यंत सुरु असतात. कोलशेत, बाळकुम येथे देखील अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे.
अशा पध्दतीने पब, बार, हुक्का पार्लर चालविणाऱ्यांकडे अग्निशमन विभागाचाही परवाना नसल्याचे दिसून आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची खाडी किनारी अनधिकृतपणे मद्यविक्रीस परवानगी नसतानाही मद्यविक्री बिनधास्तपणे सुरू आहे. या खाडीपरिसरात ध्वनिप्रदूषणास बंदी आहे. मात्र तरीही पहाटे पर्यंत धिंगाणा सुरु असल्याचे चित्र आहे.
असेच काहीसे चित्र टिकुजिनीवाडी परिसरात देखील दिसून येत आहे. या ठिकाणी पबमध्ये तर तरुण तरुणांचा तांडाच रात्री ११ नंतर येथे गिरट्या घालतांना दिसून येत असतो. तो मध्यरात्री पर्यंत या भागात धिंगाणा सुरुच असतो. मात्र त्याकडेही कोणाकडेही लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अशा पब, बार, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.