Thane News: ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर फडकला ३५ फुट उंच भगवा

आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखी ध्वजारोहन | Flag hoisting under the guidance of MLA Sanjay Kelkar
Thane News: ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर फडकला ३५ फुट उंच भगवा
Updated on

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग गेल्या नऊ वर्षापासून दुर्ग संवर्धनाचे अविरत कार्य करत आहे. आमदार संजय केळकर हे सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष असून महेश विनेरकर ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुमतारा किल्ल्यावर हे ध्वजा रोहन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश रघुवीर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Thane News: ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर फडकला ३५ फुट उंच भगवा
Thane News: माघी गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्हा सज्ज; वाचा कसे आहे नियोजन

इतिहास संकलन, पायवाटा दुरुस्ती, पाण्याचे टाके स्वच्छता, जमितीन गाडलेला प्रवेशद्वार संवर्धन, तटबंदी-बुरुज संवर्धन, गडदेवी मंदिर छत डागडुजी, दुगाड घोटवट गावं मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दिशा दर्शक व माहिती फलक लावणे, गडावर सूचना इतिहास फलक व स्थळ दर्शक फलक लावणे तसेच अनेक स्वच्छता मोहिमा यशस्वी करणे असे कार्य नियमित सुरु आहे. अशी माहिती भिवंडी विभाग सदस्य अक्षय पाटील, सागर पाटील आणि रोषण पाटील यांनी दिली.

Thane News: ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर फडकला ३५ फुट उंच भगवा
Thane News : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

११ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे अवचित्त साधून किल्याच्या बाले किल्ल्यावर कायमस्वरूपी ३५ फुट उंच परम पवित्र भगवा ध्वज लावण्यात आला. जवळपास २०० किलो वजनी साहित्य तीन तास उंच व अवघड टप्प्यातली गडचढाई करून बालेकिल्ल्यावर नेण्यात आले. रांगोळी व फुलांची सजावट करून ध्वजाची पूजा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या मुंबई, वसई विरार, सिंधुदुर्ग, अंबरनाथ, ठाणे, पनवेल, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या विभागांची उपस्थिती लाभली.

Thane News: ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर फडकला ३५ फुट उंच भगवा
Thane News : नादमध्ये बसून आमचा नाद करु नका; प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा आव्हाडांना इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.