Thane News: मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित स्पर्धेत एसएन कॉलेज अव्वल

Thane police: २६ जून या अंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाला अनुसरून महाविदयालयातील विदयार्थ्यांचा सक्रिय सहभाग व्हावा
Thane News: मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित स्पर्धेत एसएन कॉलेज अव्वल
Thane Newssakal
Updated on

Latest Thane News : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या माध्यामतून शाळा, महाविद्यालायांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. पोलीस आयुक्तालयाच्या माध्यामतून आयोजित केलेली या स्पर्धेत ओव्हरऑल बेस्ट सेलिब्रेशन या स्पर्धेत एसएन कॉलेज अव्वल ठरले आहे. तर, मोस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया मध्ये वर्तक कॉलेजने बाजी मारली आहे.

मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या अभिनय कल्पनेतून "प्रबोध" या संकल्पनेचा समोर आली, त्यानुसार २६ जून या अंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाला अनुसरून महाविदयालयातील विदयार्थ्यांचा सक्रिय सहभाग व्हावा, यासाठी अंतर महाविदयालयीन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.

त्यानुसार पोलीस आयुक्तालया अंतर्गत ११ महाविदयालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकीग स्पर्धा, रिल्स बनविण्याची स्पर्धा, एकपात्री नाटक व सांधिक नृत्य अशा पाच प्रकारच्या स्पर्धा विदयाध्यांसाठी तसेच सर्वोत्कृष्ट उत्सव, सर्वात नावीन्यपूर्ण कल्पना इत्यादी विषयांवरील स्पधीचे आयोजन त्या त्या महाविदयालयांमध्ये करण्यात आलेले होते. या स्पर्धामधून प्रथम आलेल्या सर्व विदयाथ्र्यांची आंतर महाविदयालयीन प्रबोधची अंतिम फेरी शुकवारी लता मंगेशकर नाटयगृह, मिरारोड (पूर्व) येथे पार पडलेली आहे.

यावेळी विविध महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक ८५० ते ९०० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ तसेच मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांचे हस्ते झाले. तसेच रांगोळी या स्पर्धेमध्ये एल. आर. तिवारी या महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. पोस्टर मेकींग स्पर्धेमध्ये विवा महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. रिल्स बनविण्याची स्पर्धेमध्ये वर्तक महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे.

एकपात्री नाटक स्पर्धेमध्ये दालमिया महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. सांघिक नृत्य चा स्पर्धेमध्ये रिना मेहता महाविदयालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. जागतिक अंमली पदार्थ दिनानिमीत्त मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये असा प्रकारची स्पर्धा प्रथमच आयोजीत करण्यात आली असून सदर स्पधेला महाविदयालयीन विदयाध्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.