Thane News: ठाण्यात चाललं तरी काय? महापालिकेने १० महिन्यात पुन्हा करायला घेतला तोच रस्ता

thane
thane sakal
Updated on

Thane News: खड्डेमुक्त ठाण्याचा संकल्प करत महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेऊन बहुतांश पूर्ण केली आहेत; मात्र ही दुरुस्तीची कामे होत असताना काही ठिकाणी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने ‘धूळफेक’ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घोडबंदर मार्गावरील वाघबिळ गावाकडे जाणारा गुडलक नेरोलॅक पेंट कंपनी ते नीलम बार हा एक किलोमीटर लांबीचा आणि २० मीटर रुंदीचा रस्ता पालिकेने दहा महिन्यांपूर्वी तयार केला होता; मात्र आता तोच रस्ता ४० मीटर रुंदीकरणाच्या नावाखाली पुन्हा दुरुस्तीसाठी हातात घेतला आहे. इतकेच नव्हे; तर हे रुंदीकरण करताना उखडलेली खडी आणि मटेरिअल वापरण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

thane
Thane Crime: भाजप पदाधिकाऱ्यानं गर्लफ्रेंडला कारनं चिरडलं, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांर्गत संपूर्ण शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली. ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून २८२ रस्त्यांची कामे सुरू झाली. यूटीडब्ल्यूटी, सिमेंट, काँक्रीट, मास्टिक पद्धतीने या रस्त्यांची बांधणी करून चकाचक रस्ते ठाणेकरांना देण्याचा हा संकल्प होता. यात प्रशासनाला मोठे यशही आले आहे, पण ही कामे होत असताना काही ठिकाणी संशय व्यक्त होत आहे.

त्यापैकी घोडबंदर मार्गावरील वाघबिळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या आठवड्यात या कामाकरिता टाकलेली खडी पुन्हा उखडून या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले. त्याकरिता उखडलेली खडी पुन्हा त्याच रस्त्यावर टाकून पिचिंग केले जात असल्याने ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे.

thane
Thane: डायघर वीज प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; आंदोलनाचा इशारा

खडीकरण आणि पिचिंग झालेला भाग पुन्हा उखडण्यात का आला, असा सवाल या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत. वास्तविक रस्ता खडीकरण केला असताना त्याचे काँक्रीटीकरण करणे गरजेचे होते. पूर्वी रस्ता रुंद केला त्या वेळी त्याचे बिल दिले असेल तर या कामात त्याचा समावेश केला गेला नाही ना, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

पुन्हा २० मीटर रुंदी वाढवली

वाघाबिळ येथील गुडलक नेरोलेक पेंट कंपनी ते नीलम बार हा एक किलोमीटर लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा रस्ता २० कोटी रुपये खर्च करून ठाणे महापालिका करत आहे. हा रस्ता पूर्वी २० मीटर रुंद होता. त्यामुळे आठ ते दहा महिन्यांपूर्वी महापालिकेने दोन्ही बाजूंनी दहा दहा मीटर रुंद करण्यासाठी रस्ता खोदला होता. त्यावर खडी टाकून त्याचे पिचिंगदेखील करण्यात आले होते.

thane
Thane: डायघर वीज प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; आंदोलनाचा इशारा

अपघाताची मालिका

गुडलक नेरोलॅक पेंट कंपनी ते नीलम बार रस्त्यावर दुरुस्तीनंतरही खड्डे पडले होते. पावसाळ्यात या रस्त्यावरून नातवासोबत दुचाकीवरून जाताना ८० वर्षीय वृद्धा पडल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना नीट चालता येत नाही. तसेच पतीबरोबर जाताना दुचाकीवरून घसरून पडल्याने एका महिलेच्या पायालाही प्लास्टर लावावा लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

पावसाळ्यात गुडलक नेरोलॅक पेंट कंपनी ते नीलम बार या रस्त्यावर खड्डे पडले होते. त्या वेळी त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. रस्ता रुंद करण्यासाठी खडीकरण करण्यात आले होते. आता रस्ता एकसमान करून काँक्रीटीकरण करण्यासाठी खडी काढली आहे.

- संजय कदम, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका

thane
Thane: ठाणेकरांनो पाणी जपुन वापरा; या भागात होणार १०% टक्के पाणी कपात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.