कल्याण: सध्या सोशल मीडियावर एक वृद्ध माणूस (Old Man) आपल्या पत्नीला लाथा-बुक्क्याने मारहाण (In humanely beating) करत असल्याचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव गजानन चिकणकर (gajanan chikankar )बुवा आहे. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी पत्नीला अमानुष पद्धतीने मारहाण करणाऱ्या गजानन चिकणकर बुवांना अटक केली आहे. (thane police arrest gajanan chikankar after video goes viral of assaulting to wife)
घडलेला प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी आजीबाईंना तक्रार दाखल करण्यास सांगितले. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने अखेर सामाजिक दबाव लक्षात घेता पोलिसांनीच त्या माणसावर गुन्हा दाखल केला. गजानन चिकणकर बुवा हा एक अध्यात्मिक गुरु आहे. पोलिसांनी घरी जाऊन या चिकणकर बुवांची चौकशी केली. ३१ मे रोजी या वृद्ध आजींना मारहाण करण्यात आली होती. हिल लाईन पोलिसांनी कलम ३२४,३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गजानन चिकणकर बुवा असं या मारहाण करणाऱ्या आजोबांचं नाव आहे. एका घरगुती वादातून ते आपल्या पत्नीला जाब विचारत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. इतकंच नव्हे तर आपल्या पत्नीला जाब विचारत असतानाही ते प्रचंड आक्रमक आवेशात बोलताना दिसत आहेत. पत्नीने आपल्याला उलट उत्तर केल्याच्या रागातून ते त्या वृद्ध महिलेला सुरूवातीला हाताने आणि लाथेने मारताना दिसतात. तर काही वेळाने राग अनावर झाल्यावर ते आपल्या पत्नीला चक्क प्लॅस्टिकच्या बादलीने मारहाण करतानाही दिसतात.
व्हिडीओमध्ये पत्नी आपल्या पतीला वारंवार विनवणी करताना दिसते. रडत रडत ती आपल्या पतीला 'मला मारु नका' असं सांगतानाही दिसते. पण त्या विनवणीचाही चिकणकर बुवांवर काहीच परिणाम होत नाही. उलट ते काही वेळाने पुन्हा येऊन परत पत्नीला बादलीने मारहाण करतात.नातवाने हा व्हिडीओ शूट केला आणि त्यामुळे आजोबा करत असलेला हा अमानवी प्रकार उजेडात आला.
व्हिडीओदरम्यान एक घरकाम करणारी महिला तेथेच उभी असलेली दिसते. पण ती ही मारहाण गपचूप पाहत असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा आजीबाईंचा नातू मारहाण सुरू असताना 'बास झालं...' असं घाबरत घाबरत म्हणताना दिसतो. पण तोदेखील मारहाण थांबवायला येत नाही. पण त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे चिकणकर बुवांची मात्र पोलखोल झाली. महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. मे महिन्याच्या अखेरीस ही घटना घडली असल्याचं समजतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.