Thane Crime: लहान मुले चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद, सहा आरोपींना केली अटक

Thane Crime : कासा पोलीसांनी चारोटी नाक्यावर लहान मुलं चोरून आणणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, मुलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं गेलं आहे.
Thane Crime
Thane Crime sakal
Updated on

कासा : पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारोटी नाका येथील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान मुलं चोरून आणणाऱ्या टोळक्यास कासा पोलीसांनी पकडल.

कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारोटी उड्डाण पुलाखाली काही इसम व महिला आपसात वादविवाद करून एकमेकांना मारहाण करत असल्याचे चारोटी येथील ग्रामस्थ चिराग धर्म मेहेर यांना समजले त्याने पोलिसांना कळविले त्याचं वेळी कासा पोलीस पथक सुरक्षा दृष्टिकोनातून फिरत असताना घटनास्थळी पोहोचल.

पोनि अविनाश मांदळे यांनी पथकासह वाहने थांबवून भांडण सोडवण्यासाठी पुढे गेले. भांडण करणार्‍या महिला व पुरुषांच्या सोबत दोन लहान मुलं असल्याचे दिसले. तेथील वातावरण संशयास्पद दिसल. लहान मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, त्या महिला व पुरुषांनी त्यांना कल्याण येथून चोरून आणले आहे.

मुलांच्या देहबोलीवरून ते खरे बोलत असल्याची खात्री झाल्याने पोलीसांनी तात्काळ सदर इसमांना ताब्यात घेतले. यात आपसात मारामारी करत जखमी झालेल्या ना सुरुवातीस कासा उप जिल्ह्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले होते.

आरोपी विनोद रामबापु गोसावी (वय 29 वर्षे), आकाश विजेश गोसावी (वय 28 वर्षे), अंजली विजेश गोसावी (वय 28 वर्षे),चंदा विजेश गोसावी (वय 55 वर्षे). जयश्री अशोक गोसावी (वय 25 वर्षे),

राहुल रामअप्पा गोसावी (वय 27 वर्षे) सर्व रा. मेशाळ, विजयनगर, ता. मिरज, जि. सांगली . यांच्या कडून पोलीस खाक्या दाखवत विचारणा केली असतां त्यांनी हे दोन मुलं चोरून आणल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या दोन मुल. एक सुरज कुमार मिश्रा (वय 8 वर्षे),सत्यम कुमार मिश्रा (वय 5 वर्षे) अशी आहेत.

पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी पहिल्यांदा घाबरलेल्या, भेदरलेल्या या लहान मुलांना खाऊ पिऊ घातलं त्यांना धीर दिला. त्यांच्याकडून नीट माहिती घेतली.मुलांच्या चौकशीदरम्यान त्यांना कल्याण येथून दोन दिवसा पूर्वी गोड बोलून रिक्षात घालून पुढें ट्रक मधून पळवून आणल्याचे समोर आले.

त्यानुसार कासा पोलिसांनी तपास चक्र फिरवत तात्काळ कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेव्हा तेथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 1011/2024, कलम 137(2) प्रमाणे दोन मुलं हरवल्याची नोंद असल्याची खात्री झाली.

कल्याण पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक रात्री उशिरा कासा पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच बरोबर मुलांचे वडील अखिलेश मिश्रा हे देखील आले होते. त्यांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. पथकात पोउपनिरीक्षक किरण भिसे, पोहवा कदम, पोहवा किरपण, पोना मधाळे हे उपस्थित होते. संशयीत महिला व पुरुष तसेच दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

संशयित आरोपींनी आपापसात भांडण केल्यामुळे किरकोळ स्वरूपात जखमी झाले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे करण्यात आली आहे. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी तसेच चारोटी नाका येथे अनेक फिरस्ते झोपड्या करून पोटापाण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय करीत आहेत. कटलरी, लसुन ,भांडी, कपडे विकत आपलं पोटभरी आहेत. रात्रीच्या वेळी काही संशयास्पद धंदे देखील करत असल्याचे नागरिक म्हणत आहेत. त्या परिसरातील ग्रामपंचायत ने याबाबतीत लक्ष द्यावं. यात अनेक अनोळखी परराज्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक सुद्धा असू शकतात.

मागे दोन-चार वर्षांपूर्वी गडचिंचले येथे मुलं चोरणारी लोक आलेली आहेत अशी अफवा पसरल्याने साधू हत्याकांडा सारखी घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये..

या घटनेबद्दल कासा पोलीस ठाणे अधिकारी अविनाश मांदळे म्हणाले की आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी .अनोळखी इसमा बरोबर बोलू देऊ नये .कोणत्याही आमिषाला बळी पडू नका .तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.