Thane: सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्जपणा; वज्रेश्वरी रस्त्यावर मध्यभागी मोठे भगदाड

Latest Bhiwandi News : मार्गाची रुंदीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख सुनील देवरे यांनी केली आहे.
Thane: सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्जपणा; वज्रेश्वरी रस्त्यावर मध्यभागी मोठे भगदाड
Updated on

दीपक हिरे (वज्रेश्वरी बातमीदार)

अंबाडी वज्रेश्वरी वरून जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक 81वरील अंबाडी शिरसाड मार्गावर गेले दहा दिवसा पासून येथील कन्या विद्यालय जवळ असलेल्या एका मोरीला मोठे भगदाड पडले आहे, त्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एखादा भयंकर अपघात होण्याचा सभाव्य धोका निर्माण झाला.

या कडे भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभाग चे अभियंता चे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा संतप्त सवाल नागरिक करीत असून अरुंद आणि दुहेरी वाहतूक असलेल्या या अत्यंत व्यस्त मार्गाची रुंदीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख सुनील देवरे यांनी केली आहे.

Thane: सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्जपणा; वज्रेश्वरी रस्त्यावर मध्यभागी मोठे भगदाड
Thane News : ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार २४००० रुपयांचे सानुग्रह अनुदान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अपघातात मृत्यू मुखी ची संख्या वाढत आहे. येथील कन्या विदयालय जवळ रस्ता पूर्ण पणे उखडून गेला असून, तसेच रस्ता एका बाजूने पूर्ण खचला आहे, तसेच या रस्त्याच्या मध्य भागी एका मोरीला गेले दहा दिवसा पासून भगदाड पडले आहे. हे भगदाड तीन फूट लांब व सात फूट खोल एवढे भयंकर असून तसेच आहे.

मात्र कुठलाही फलक नाही, त्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मोठा अपघात होण्याचा संभव आहे, एवढे असूनही या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग चे दुर्लक्ष होत आहे. नुकत्याच गणेशपुरी शिवाजी चौक येथील वज्रेश्वरी न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालय जवळ रस्त्यात एका रेती कच च्या हायावा ट्रक ला खड्यात पडून अपघात झाला.मात्र सुदैवने शाळा बंद अस ल्याने जीवित हानी टळली.

येथील नादरुस्त रस्त्या मुळे जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा संतप्त सवाल नागरिक करीत असून अरुंद आणि दुहेरी वाहतूक असलेल्या या अत्यंत व्यस्त मार्गाची रुंदीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख सुनील देवरे यांनी केली आहे.

Thane: सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्जपणा; वज्रेश्वरी रस्त्यावर मध्यभागी मोठे भगदाड
Thane News : अन् वाचले मातेसह नवजात अर्भकाचे प्राण! मर्जिया पठाण यांनी दिला मानवतेचा धडा

या मार्गावरील वज्रेश्वरी, गणेशपुरी , तुंगारेश्वर हे मोठे प्रसिद्ध देवस्थान , पर्यटन स्थळे , वसई , भिवंडी आणि वाडा तालुक्याचे अत्यंत वेगाने वाढणारे नागरिकी करणं, त्यामुळे शिरसाड अंबाडी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ दिवसरात्र सुरू असते .

मात्र मुसळधार पावसाळामुळे या रस्त्यावर शंभर टक्के खड्डे पडल्याने दररोज चे वाहनाना अपघात होत असल्याची नोद मांडवी पोलीस ठाणे येथे होत आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

हा रस्ता आजही अरुंद आणि एकाच मार्गावरून दुहेरी वाहतुकीचा असून कारखान्यातील अवजड माल, गवतपाला , खडी, कच, डबर , वीट ने ओव्हरलोड भरून हायवा ढंपर भरमसाठ वेगाने या मार्गातून दिवस रात्र वाहतूक करीत असतात. यामध्ये येणारा चालक जाणारा चालक यांचा ताळमेळ न बसल्याने समोरासमोर अनेक भीषण अपघात घडले आहेत . याचबरोबर दुचाकी चे आणि पायी चालणाऱ्यांचे अपघात घडून कैक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे .

असे अपघात आजही सुरूच असल्याने हे अपघात हा मार्ग अरुंद आणि दुहेरी असल्याने घडतात या मार्गात रस्ता कडेला मोठ्या संख्येने शाळा,महाविद्यालय, अंगणवाडी, व विध्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्रे आहेत त्यामुळे या भागात आजूबाजूच्या खेड्यापाडायातील गोरगरीब आदिवासी मुले, मुली शिक्षणा साठी येतात.तसेच आठवडी बाजार ,शेतमाल विक्री , खरेदीसाठी , मजुरीसाठी, कारखान्यातील कामांवर जाणाऱ्यांना या मार्गाचा वापर करावा लागतो. यात अनेक वाहने क्षमते पेक्षा दुप्पट माल भरून संपूर्ण महामार्गावर धुळ, कच आणि खडीचा जीवघेणा थर रस्त्यावर पाडत जातात.

Thane: सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्जपणा; वज्रेश्वरी रस्त्यावर मध्यभागी मोठे भगदाड
Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी

त्यामुळे अनेक दुचाकीस्वरांचा जीवघेणा अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. अनेकांनी यामुळे आपला जीव देखील गमावला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी लक्ष देऊन पुढे अपघात घडू नये यासाठी उपाययोजना म्हणून रस्त्याची रुंदी वाढवून दुभाजक, जेब्रा क्रॉसिंग,लावावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेशपुरी विभाग प्रमुख सुनील देवरे यांनी केली आहे.

Thane: सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्जपणा; वज्रेश्वरी रस्त्यावर मध्यभागी मोठे भगदाड
Thane Crime : उघड्यावर नवजात अर्भक ठेवून परित्याग केलेल्या महिलेला कळवा पोलिसांनी केली अटक !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.