Thane Rain Update : उल्हास, काळू नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ; 'या' नदीनं गाठली धोका पातळी, गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यात (Thane) मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे.
Thane Rain Update Ulhas River
Thane Rain Update Ulhas Riveresakal
Updated on
Summary

मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सायंकाळनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे.

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात (Thane) मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. उल्हास नदीच्या (Ulhas River) पाणी पातळीत वाढ होऊन बुधवारी सकाळी 15.60 मीटर वर उल्हास नदी वाहत आहे.

16.50 नदीची धोका पातळी आहे. तर, काळू नदीने धोका पातळी गाठली असून 102.20 मीटरने नदी वाहत आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Thane Rain Update Ulhas River
Koyna Dam Update : मोठा दिलासा! आपत्कालीन परिस्थितीवर मात करत कोयना धरणातून तब्बल 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती

यावर्षी पावसास उशिराने सुरवात झाली असली तरी सातत्याने पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department) जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सायंकाळनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे.

बुधवारी सकाळी देखील शहर, तसेच ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम होता. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नद्या, नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पाणी पातळी गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे.

Thane Rain Update Ulhas River
Rain Update : सोलापुरात Non Stop सलग 22 तास धुवांधार; बळीराजा खूश, खरिपाच्या पिकांना मिळणार जीवदान

उल्हास नदीची इशारा पातळी 16.60 मीटर इतकी आहे. तर, धोका पातळी 17.50 मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उल्हास नदी बदलापुरात 15.60 मीटर पातळीवरून वाहत होती. तर याच नदीवर जांभूळ आणि मोहन येथे नोंदवलेली नदीची पातळी इशारा पातळीच्या जवळ गेल्याचे दिसून आले आहे.

Thane Rain Update Ulhas River
Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

अनुक्रमे 8 व 12.50 मीटरने येथील पाणी वाहत आहे. तर त्यांची धोका पातळी अनुक्रमे 9 व 13 मीटर इतकी आहे. बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला या नदीमुळे पुराचा फटका बसत असून या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच काळू नदी टिटवाळा बंधाऱ्याजवळ इशारा पातळीवर वाहते आहे. काळू नदीची इशारा पातळी 102 मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळू नदी 102.20 मीटर या पातळीवरून वाहत होती. काळू नदीची धोका इशारा पातळी 103.50 मीटर इतकी आहे.

Thane Rain Update Ulhas River
Rain Update : धो धो पाऊस पडताच लाईटीची सुरु झाली बोंबाबोंब; 'हेस्कॉम'कडं 100 हून अधिक तक्रारी

असाच पाऊस सुरू राहिल्यास काळू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहण्याची शक्यता आहे. तर, रायगड जिल्ह्यातील नेरळ, माथेरान आणि कर्जत परिसरात मोठा पाऊस झाल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.