Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!

Latest Mumbai News : या पुतळ्याखालीच कवी कलश यांचेही शिल्प उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!
Updated on

राजीव डाके

Latest Thane News: महामानवांचे पुतळे राजकारणाच्या वादात अडकलेले दिसतात. ठाण्यातही काहीसा असाच वाद घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य स्मारक चार महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

तसेच, या ठिकाणी महाराजांना केवळ ‘धर्मवीर’ अशी उपाधी लावली आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या विलंबासोबतच ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’ असा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!
PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ असे संबोधू नका, तर त्यांना ‘स्वराज्यरक्षक’ अशी उपाधी लावा, असे वक्तव्य दोन वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केले होते.

आता ते महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत; मात्र ठाण्यातील कोपरी भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तयार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य स्मारकावर ‘स्वराज्यरक्षक’ अशी उपाधी न लावता केवळ ‘धर्मवीर’ अशी उपाधी लावली आहे. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

कोपरी येथील राजनगरात हे शौर्य स्मारक उभे केले आहे, त्यासाठी ५० लाखांचा निधी खर्च झाल्याचे समजते. या ठिकाणी सिंहासोबतचा महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याखालीच कवी कलश यांचेही शिल्प उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!
Thane Crime: लहान मुले चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद, सहा आरोपींना केली अटक

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या स्मारकाचे काम झाले होते; मात्र त्यावेळी त्याचे उद्घाटन होऊ शकले नाही. त्यामुळे स्मारक तयार असूनही ते लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ठेवले होते, तेव्हापासून अजून ते झाकलेल्या अवस्थेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळताच लवकरच त्याचे उद्घाटन होईल, असे स्थानिक नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती फिरू लागलेले आहे. अरबी समुद्रात उभे राहणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला होणारा विलंब, मालवण,

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पडलेला पुतळा आणि दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांना लावल्या जाणाऱ्या ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’ या उपाधीवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. २०२२ मधील हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी ‘धर्मवीर’ उपाधीवरून सत्ताधाऱ्यांना ताकीद दिल्याने राजकीय वाद तापला होता; परंतु आता पुन्हा असेच राजकारण ठाण्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावर केवळ ‘धर्मवीर’ उपाधी लावल्याने रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!
PM Modi in Thane: मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी !

स्मारक जनतेच्या पैशांतून उभे केले आहे. पाच महिन्यांपूर्वीच स्मारक बांधून तयार असेल तर ते कधी खुले करणार? दोन दिवसांत त्याचे उद्घाटन झाले नाही तर राष्ट्रवादी उद्घाटन करेल. शिवाय, या स्मारकावरील महाराजांच्या नावापुढे केवळ ‘धर्मवीर’ ही उपाधी लावली आहे. ते केवळ ‘धर्मवीर’च नव्हे तर आधी ‘स्वराज्यरक्षक’ होते ही उपाधीदेखील लावणे आवश्यक आहे.

- सुहास देसाई, अध्यक्ष ठाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)

केंद्र आणि राज्य सरकारला महामानवांच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. छत्रपती संभाजी महाराज यांना जनतेने जेवढ्या उपाध्या दिल्या आहेत, त्या कमी आहेत. महाराज यांचे कार्य एका धर्मापुरते मर्यादित नाही. त्यांचे काम स्वराज्यरक्षकाचे आहे, त्यामुळे ही उपाधी डावलणे त्यांच्या अवमनासारखेच आहे.

- संजय घाडीगावकर, उपजिल्हाप्रमुख, ठाकरे गट

Thane: ‘धर्मवीर’ की ‘स्वराज्यरक्षक’? छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वादात!
Thane News : सहकार शाळेत पोषण आहारातून विषबाधा; 40 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.