Balya Mama: 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच एका वर्षाच्या आत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करणार असे आश्वासन त्यांनी समितीला दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार म्हात्रे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा महायुतीला हा मोठा दणका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.