Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

Thane: ठाण्यातील साठे नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या नूरजहाँ शेख असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
Updated on

राजीव डाके

Thane Latest News : महाभारतातील एकलव्याने द्रोणाचार्य यांचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्येत निपुणता मिळवली. ठाण्यातही याच एकलव्याला नजरेसमोर ठेऊन एका महिलेने केवळ शिक्षीकेचा शिकवण्याचा आवाज ऐकून शिक्षण घेतले.

मराठी आणि गणिताचा पेपर उत्तमरीत्या सोडवला. तिच्यातील शिक्षणाची ही जिद्द पाहून त्या शिक्षिकाही आश्चर्यचकित झाल्या. तिच्यातील एकलव्य गुण पाहून त्यांनी तिला एकलव्य विद्यार्थिनी असे नाव दिले. ठाण्यातील साठे नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या नूरजहाँ शेख असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
Success Story : दोन सख्ख्या भावंडांनी प्रतिकूल परिस्थितीत सीए पदाला घातली गवसणी

नूरजहाँ शेख ही सध्या ३८ वर्षीय आहे. वडिलांकडील गरिबीमुळे लहानपणी तिला शाळेत जाता आले नाही. लग्नानंतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी दोघा नवरा बायकोच्या खांद्यावर आली. मुलांना शिक्षण देता यावे म्हणून तिचा पती ठाण्यात रिक्षा चालवतात, तर तेवढ्याने खर्च भागवत नाही म्हणून ती देखील जेवण बनवणे, झाडलोट करण्याची कामे करते. या पैशांतून कसेबसे चार मुलांचे शिक्षण आणि घराचा गाडा सुरू आहे. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिची शिक्षणाची हाऊस मात्र राहून गेली. पण आता तिला ही संधी मिळाली आहे, नव्हे तिनेच ती मिळवून घेत तिचे सोने करून घेतले आहे.

नूरजहाँ काम करीत असलेल्या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस तिच्या सारख्याच शिक्षण न घेतलेल्या जेष्ठ महिला शिकण्यासाठी येतात. या वर्गात नूरजहाँ झाडू मारणे, फरशी पुसणे, वर्गातील महिलांना नाष्टा बनवून देणे अशी कामे करते. ही कामे करत असताना जेष्ठ इतर महिलांना अक्षरांची ओळख शिकवत असताना नूरजहाँने हे ते ऐकून ऐकून आत्मसात केले. कामाच्या साठी येता-जाता फळ्यावरील अक्षरे नजरेत साठवून त्यांची मनातल्या मनात उजळणी केली. घरी गेल्यावर तिने ती अक्षरे लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला चांगले यश आले. ती आता उत्तम प्रकारे लिहिते, वाचते आहे.

Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
Success Story : रिचाने कुटुंबियांचा विरोध पत्कारून उभी केली महिलांच्या अंडरगारमेंट्सची कंपनी, आज आहे कोट्यावधींची मालकीण

तिचे लिहिणे वाचणे पाहून तिचे पती आणि मुलेही खुश आहेत. तर ज्येष्ठ महिलांना शिकवणाऱ्या आजी आई शाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील यांनी तिच्या या विद्यार्थिनीला एकलव्य विद्यार्थ्यांनी असे नाव दिले आहे.

नूरजहाँ ही अनेक वर्षांपासून जेवण बनवण्याचे काम करते. गेल्या आठ नऊ महिन्यापासून जेष्ठ अशिक्षित महिलांसाठी मी शिकवणी वर्ग सुरू केला आहे. त्या वर्गात ती काम करते. काम करत असताना वर्गात शिकवलेली अक्षरे आणि अंक ओळख तिने कशी आत्मसात केली हे मलाही समजले नाही. चार दिवसांपूर्वी आजींची परीक्षा घेत असताना नूरजहाँ हिने परीक्षेला बसू देण्याची मला विनंती केली. तिला वाईट वाटू नये म्हणून परीक्षेला बसून तिला पेपर सोडवण्यासाठी दिले. तिने ते उत्तमरीत्या सोडवलेले पाहून मलाही आश्चर्य वाटले. ती आमच्या सगळ्यांची एकलव्य प्रमाणेच आहे.

- माधुरी पाटील, अध्यक्षा, शिक्षिका आजी आई शाळा

Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
Success Story: खारेमुरे विकणारा गजानन झाला वकील! खाण्याची भ्रांत असलेल्याची प्रेरणादायी संघर्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.