Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी

latest Thane News: यासंबंधीचा सविस्तर आराखडा ठाणे पालिका प्रशासनाने एमएमआरडीएकडे नुकताच पाठविला आहे
Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी
Updated on

Latest Marathi News: ठाणे-मुंबईचा प्रवास सुसाट व्हावा, या उद्देशाने एमएमआरडीएच्या माध्यमातून ईस्टर्न फ्रीवेचा छेडानगर ते ठाणेपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईतील अंतर कमी होणार आहे.

त्यापाठोपाठ आता ठाण्यातील तीन हात नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यू आकाराच्या ‌उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर आराखडा ठाणे पालिका प्रशासनाने एमएमआरडीएकडे नुकताच पाठविला आहे. हा आराखडा मंजूर झाल्यास नागरिकांची इंधन आणि वेळेत बचत होणार आहे.

Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी
Thane Murder: पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या, वाचा कुठे घडला प्रकार?

ठाणे व मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून घाटकोपर छेडानगर ते ठाणे असा फ्रीवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आता ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचे व वाहनांची ये-जा असणारा सर्कल म्हणून तीन हात नाका सर्कलकडे पहिले जात आहे. या सर्कलवरून मुंबई, ठाणे, घोडबंदर, गुजरात, नाशिक अशा अवजड वाहनांसह इतर वाहनांची वाहतूक होते.

ठाणे रेल्वे स्थानकातून बस, रिक्षा तसेच खासगी वाहनांची वाहतूक याच मार्गे होते. या जंक्शनवरील सिग्नलचा कालावधी इतर सिग्नलपेक्षा अधिकच आहे. त्यामुळे प्रत्येक एक सिग्नल सुटल्यानंतर इतर सहा मार्गांवर सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा लागतात.

चाकरमान्यांसह, बस, रिक्षा अशा वाहनांची या रस्त्यावर मोठी वर्दळ सुरू असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचे नियोजन करताना पोलिसांचीही दमछाक होते. ही कोंडी सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा अभ्यास करून यासंदर्भातील आराखडा तयार केला होता.

Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी
Thane Crime : उघड्यावर नवजात अर्भक ठेवून परित्याग केलेल्या महिलेला कळवा पोलिसांनी केली अटक !

एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी आणि ठाणे महापालिका सौरभ राव यांची नुकतीच एक बैठक पार पडली होती. यावेळी तीन हात नाका सर्कलवरील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक सुधारणा प्रकल्प एमएमआरडीएमार्फत राबविण्याबाबत चर्चा झाली होती.

ठाणे पालिकेतील नियुक्त नोडल सल्लागार मे. इन्फ्रा डिझाइन कंपनीने तयार केलेला प्रकल्प आराखडा पालिकेने एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळल्यास नागरिकांची इंधन आणि वेळेत बचत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिग्नलची वेळ कमी होणार

आराखड्यानुसार हरीनिवास सर्कल, पूर्व द्रुतगती महामार्ग, नवीन स्थानक, ॲपलॅब चौक असा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गामुळे नागरिकांचा प्रवास वेगवान होण्याबरोबरच चौकातील सिग्नलची वेळ कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांची इंधन आणि वेळेत बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी
Thane Politics: ठाण्यात भाजपमध्ये होणार बदल? इच्छुकांची मांदियाळी, भूमिपुत्रांना संधी देण्याची मागणी

असा असेल मार्ग

हरिनिवास चौकातून उन्नत मार्गाची सुरुवात होणार आहे. पुढे तीन हात नाका चौकातील सेवा रस्त्यावरून पुढे जाऊन तो यू आकाराने पलीकडच्या सेवा रस्त्यावर नेला जाणार आहे. त्यानंतर पुढे हा मार्ग ॲपलॅब चौकापर्यंत नेला जाणार आहे. या मार्गाला नवीन स्थानकातून येणारी मार्गिका जोडली जाणार आहे. शिवाय, काही ठिकाणी हा मार्गावरून खाली उतरण्यासाठी मार्गिका तयार केल्या जाणार आहेत.

Thane Traffic: तीन हात नाका परिसर होणार कोंडीमुक्त, यू आकाराच्या उन्नत मार्गाची होणार उभारणी
Thane Politics: ठाण्यात भाजपमध्ये होणार बदल? इच्छुकांची मांदियाळी, भूमिपुत्रांना संधी देण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.