Thane: ठाणेकरांनो पाणी जपुन वापरा; या भागात होणार १०% टक्के पाणी कपात

Thane: ठाणेकरांनो पाणी जपुन वापरा; या भागात होणार १०% टक्के पाणी कपात
Updated on

ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून प्रतिदिन २५० द.ल.लि. पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे.

Thane: ठाणेकरांनो पाणी जपुन वापरा; या भागात होणार १०% टक्के पाणी कपात
Nashik Water Cut: नाशिकरोड भागात 36 तासांसाठी पाणीबाणी; या तारखांना पाणीपुरवठा बंद

परिणामी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे पालिकेस मुंबई महापालिकेमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार आहे. पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने १० टक्के पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर पंधरा दिवसांतून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणीकपातीची वेळ वाढवून १२ तासांऐवजी २४ तास करण्यात येत आहे.

त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपाखाडी, टेकडी बंगला, किसननगर १ व २, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे १० टक्के पाणीकपात लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Thane: ठाणेकरांनो पाणी जपुन वापरा; या भागात होणार १०% टक्के पाणी कपात
Pune Water Supply : मिटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार

पंधरा दिवसांतील बंद पाणीपुरवठा ; वार पाणी बंदचे ठिकाण

सोमवार ब्रह्मांड, बाळकुम

मंगळवार घोडबंदर रोड

बुधवार गांधीनगर

गुरुवार उन्नती, सरकारपाडा, सिद्धांचल

शुक्रवार मुंब्रा (रेतीबंदर)

शनिवार समतानगर

रविवार दोस्ती आकृती

सोमवार जेल

मंगळवार जॉन्सन, अनंतकाळ

बुधवार साकेत, रुस्तमजी

गुरुवार सिद्धेश्‍वर

शुक्रवार कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर ४

शनिवार इंदिरानगर

रविवार ऋतू पार्क

Thane: ठाणेकरांनो पाणी जपुन वापरा; या भागात होणार १०% टक्के पाणी कपात
Water Supply : घाटकोपर परिसरातील काही भागात पाणी पुरवठा वेळांमध्ये बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.