बहाडोलीचे जांभूळ आख्यान ; जांभळाने दिली गावाला ओळख

पालघर जिल्हा जसा चिकू साठी प्रसिद्ध आहे तसाच तो आता जांभळा साठीही प्रसिद्ध आहे.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

पालघर : एकेका ठिकाणाला आपली वेगळी ओळख असते काही ठिकाणे मंदिरा (Temple) मुळे प्रसिद्ध असतात तर काही ठिकाणे पर्यटनासाठी (Tourisom) प्रसिद्ध असतात. काही ठिकाणे तर खाण्याच्या पदार्थासाठी ओळखली जातात. पालघर जिल्हा जसा चिकू साठी प्रसिद्ध आहे तसाच तो आता जांभळा (Jamun) साठीही प्रसिद्ध आहे. या जांभळांनीच बहाडोळी गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

जगप्रसिद्ध असलेल्या पालघर तालुक्यातील बहाडोली गावामधील टपोरी जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशील असून हे मानांकन मिळाल्यास हा जांभूळ एकमेवाद्वितीय असल्याची पावती त्याला मिळेल, यासाठी येथील जांभूळ उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळणार असून त्यासरशी वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न हि सुरु आहेत.

बहाडोळी गाव हे राज्यभरात जांभळासाठी परिचित असल्यामुळे या गावाला जांभूळगाव म्हणूनही ओळखले जात आहे. या गावात जांभळाचे उत्पादन चांगल्या प्रतीचे असून अधिकाधिक जांभळाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावा व या गटाच्या माध्यमातून जांभूळ संवर्धनासाठी जांभळाच्या झाडांची लागवड करावी. जेणेकरून येत्या काही काळात त्या झाडापासून येथील शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेता येईल. यासाठी कृषी विभाग हि प्रयत्नशील आहे. सध्या बाडोली गावात असलेल्या जांभळाच्या झाडाची संख्या ही पाच हजाराच्या सुमारास असून सर्व झाडांना चांगल्या प्रतीची जांभळे येत आहेत येथील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागामार्फत जांभूळ संवर्धनासाठी शेतीशाळा सुरू करण्याचा मानस आहे.

Mumbai
बीड: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

यासाठी सर्व शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणून त्यामार्फत उत्पादन वाढीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण दर आठवड्याला त्यातून देण्यात येणार आहे. यावेळी कृषी विभाग जांभूळ उत्पादनासाठी जी जुनी झाडे आहेत त्यांना अधिकाधिक फळ लागण्याच्या दृष्टीने जांभूळ जुन्या झाडांचे पुनर्जीवन करणे, जांभूळ झाड नव्याने लागवड करणे, फवारणी व खतांसाठी अवजारे उपलब्ध करून देणे, फळे काढणीसाठी शिडी अनुदान तत्त्वावर मिळवून देणे, बाजारपेठ उपलब्ध करून जास्तीत जास्त बाजार भाव मिळवून देणे, साठवणूक शीतगृह तयार करून देणे, जांभळापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे, ग्राम स्तरावरील विविध विभागाकडून योजना राबविण्यासाठी सहकार्य करणे, शेतकरी स्वयंसहायता गट स्थापन करून गटशेतीतून अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे अशी कामे कृषी विभाग शेतकऱ्यांबरोबरीने करणार असल्याने आता या गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जांभूळ उत्पादकांची नवी कल्पना बाजारात आणली आहे. बहाडोली येथील दर्जेदार व स्वादिष्ट जांभळाला बाजारात चांगला दर व ख्याती मिळावी, तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथील उत्पादक गटांनी विशिष्ट प्लास्टिक डब्यातून जांभूळ पॅकिंगला सुरूवात केली आहे. त्यामुळे या टपोरी जांभळाला बाजारात वेगळे स्थान निर्माण होईल, असा विश्वास जांभूळ उत्पादक व्यक्त करीत आहेत.

Mumbai
पालघरमधील माता-बाल संगोपन केंद्राची इमारत धोकादायक; प्रसूतिगृह, आंतर रुग्णालय कक्ष सुरूच 

पालघरमधील बहाडोली येथील दर्जेदार, स्वादिष्ट जांभळाला बाजारात स्थान निर्माण करण्यासाठी गट स्थापन करून उत्पादकांनी कंपनी स्थापन करावी यासाठी आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले असून लवकरच येथे जांभळावर आधारित वेगवेगळे उद्योग सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न हि सुरु झाल्याने हे गाव आता राज्याच्या नकाशावर जातलाचे गाव म्हणून झळकणार आहे.

Mumbai
प्रियांका चोप्राच्या 'द व्हाइट टायगर'ला ऑस्कर नामांकन 

बहाडोली येथील जांभूळ प्रसिद्ध असून 50 हेक्टर जमिनीवर सद्या लागवड असून , नव्याने पंचवीस हेक्टर जागेवर लागवड करण्यात आली आहे. प्रदेशात हि जांभळे पाठवायची असल्यास त्याला मानांकन लागते. या नामांकनासाठी प्रयत्न चालू असून केंद्र सरकारच्या कृषी पथकाने येथे भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्याकडून प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र सरकारकडून हि याबाबत प्रयत्न चालू असून नाना पाटोळे हेही यासाठी प्रयत्न करत आहेत. नामांकनासाठी पंचवीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हे पैसे सध्या शेतकऱ्यांनी खर्च करायचे आहेत शासनाकडून यासाठी पैसे मिळवण्याचे प्रयत्न कृषी विभाग करत आहे. शेतकऱ्यांची बेसिक माहिती जमा केली असून अजूनही कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे या वर्षामध्ये नामांकन होईल यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न चालू असल्याचे कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

बहाडोली येथील जांभळे एप्रिल मध्ये तयार होतात एप्रिल ते 15 जून हे दोन महिनेच हंगाम चालतो. बाजारात या काळात येथील जांभळाना मोठी मागणी असल्याने जांभळे या काळात सरासरी 500 रुपये किलो विक्री होते. या दोन महिन्यात एकूण उलाढाल आठ-दहा कोटीची होती . हि जांभळे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही विक्रीसाठी जातात . या जांभळांना मोठी आहे. परंतु लागवडीचे क्षेत्र कमी असल्याने मागणी पूर्ण करता येत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.