मुलीच्या लग्नकार्यासाठी बनवलेले दागिने दरडीत गेले वाहून

माजी पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी घेतली मुलीच्या संपूर्ण लग्नाची जबाबदारी
help
helpsakal
Updated on

घाटकोपर : 22 जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर मध्ये आलेल्या मुसळधार पावसाने काही गावात पुराचे पाणी शिरले तर काही गावांना दरडीचा सामना करावा लागला. महाड तालुक्यातील तळीये तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व साखर सुतारवाडी दरड कोसळून अनेक घरे मातीमोळं झाली. यात साखर सुतारवाडी मध्ये 11 घरांवर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. यात एका हाताने दिव्यांग असणाऱ्या विठ्ठल चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी पै पै जमा करून बनवलेले दागिने दरडीत वाहून गेल्याने चव्हाण कुटुंबावर मोठे संकट कोसळले.

help
गोळीबार नगरच्या पुनर्विकासासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा

विठ्ठल चव्हाण यांची कन्या पूजा हिच्या लग्नकार्यासाठी दागिने बनवण्यात आले होते. विठ्ठल चव्हाण हे साखर मधील चव्हाण वाडी मध्ये राहतात. गरिबी परिस्थितीने चव्हाण यांच्या घराचे दरवाजे मजबूत व साधी कडी नसल्याने त्यांनी साखर सुतारवाडी येथील त्यांचे जवळचे नातेवाईक भरत सुतार यांच्या घरात दोन महिन्या पूर्वीच दागिने सुरक्षित राहण्यासाठी ठेवले होते मात्र याच घरावर दरड वाहून आल्याने हे घर दरडीत नेस्तनाबूत झाले. विठ्ठल चव्हाण यांनी भारतात कोरोना येण्यापूर्वी मुंबईत येऊन कामधंदा करत कुटुंब उदरनिर्वाहाचा विचार केला होता. अडीच वर्षे ते मुंबईत भाड्याच्या रूम मध्ये राहून कुटुंबाचा संभाळ करत होते. मुलगी पूजा हिचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

help
झाडे जगण्याचे प्रमाण देशात 80% ; महापालिकेत मात्र 54 टक्के; 'CAG'चा ठपका

बारावी पूर्ण करून तिने कुटुंबाला साथ देण्यासाठी नोकरी शोधली मात्र ऐन वेळी मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मध्ये कुटुंबाने आपल्या गावी धाव घेतली. या दरम्यान मुलीच्या लग्नासाठी विठ्ठल चव्हाण यांनी दागिने बनवून ठेवले होते. दिवाळी नंतर मुलीच्या लग्नाची तयारी होणार होती मात्र दरडीत सोनेच वाहून गेल्याने या कुटुंबावर आर्थिक दृष्ट्या मोठे संकट ओढवले. या कुटुंबाची माहिती मिळताच माजी पोलीस अधिकारी व महाड मध्ये राहणारे दिलीप जाधव यांनी या मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी घेत खाकी वर्दीचा विश्वास वाढवला आहे.

help
राज्यपाल नियुक्त पदांबाबत ,न्यायालयाचे निरीक्षण

"दिलीप जाधव ( माजी पोलीस अधिकारी ) दुःख हे मी लहान पणापासून पाहत आलो आहे. त्यामुळे कुणाचं दुःख मला पाहावत नाही. साखर सुतारवाडी मध्ये दरड कोसळली आणि गावात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबांनी पै पै जमा करून मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिनेच दरडीत वाहून गेले. या कुटुंबाची आर्थिक बाजू पाहून माणुसकीच्या नात्याने मी ही सेवा केली आहे."

- दिलीप जाधव ( माजी पोलीस अधिकारी )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.