Thane: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष !

Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला.
The Marathi language has been granted classical status by the central government
The Marathi language has been granted classical status by the central governmentSakal
Updated on

ठाणे: अमृतातेही पैजे जिंका' असे ज्ञानेश्वर माऊलंनी जिचे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासानाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला.

मराठी या अद्धितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. मिनाक्षी शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ओवळा आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरु होते.

The Marathi language has been granted classical status by the central government
PM Modi In Thane: पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, 12 तास रहदारी राहणार बंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता. निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला होता. घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.