Mumbai Costal Rode: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या शहरामध्ये प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे. शिक्षण, व्यापार, आरोग्य, चित्रपटसृष्टी, पर्यटन यामध्ये अग्रेसर असलेले महानगर आता मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे अधिक विकसित होणार यात शंका नाही.
येथील प्रगत अभियांत्रिकी आणि कुशल कामगारांमुळेच मुंबई किनारी रस्त्यासारखा महाकाय प्रकल्प वेळेत पूर्ण होत असल्याचे गौरवोद्गार इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी काढले. त्यांनी कोस्टल रोडला भेट दिली.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या भेटीदम्यान इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह त्यांच्यासोबत इस्त्राईलचे पदाधिकारी आणि अभियंते यांच्यासह पालिकेचे उप आयुक्त चक्रधर कांडलकर, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता एम. एम. स्वामी, इस्त्राईल दुतावासातील राजकीय संबंध व विशेष उपक्रम विभागाचे अनय जोगळेकर यांच्यासह किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते, कामगार उपस्थित होते. मिरी रेगेव्ह यांनी हाजी अली येथील आंतरमार्गिका (इंटरचेंज), प्रियदर्शनी पार्कपासून ते पारसी जिमखान्यापर्यंत भूमिगत बोगद्याची पाहणी केली.
मिरी रेगेव्ह यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठिकाणी कामगारांशीदेखील संवाद साधला. ‘तुमच्या हातांनी प्रचंड मोठे काम केले आहे. भविष्यात आमच्या देशाला तुमची गरज भासेल. अशाप्रकारचे भव्य प्रकल्प उभारण्यासाठी आम्हाला नक्की सहकार्य करा’, अशा शब्दात त्यांनी कामगारांची पाठ थोपटली. तसेच काही कामगारांसोबत सेल्फीदेखील घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.