घरामध्ये खेळता खेळता एका १० महिन्यांच्या बाळाचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पनवेलमधील पळस्पे गावात रविवारी (ता. ५) दुपारी घडली.
आशिक अल इमान असे बाळाचे नाव आहे. अशिकची आई घरामध्ये झोपली असताना, आशिक घरात खेळत होता. खेळता खेळता तो बाथरूममध्ये गेला आणि पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. काही वेळाने आई झोपून उठल्यानंतर तिला आशिक दिसला नाही. शोधा शोध केल्यानंतर तो बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादलीत डोके उलथून पडलेला आढळून आला.
तिने पतीला याची माहिती दिल्यानंतर त्याने तत्काळ घरी धाव घेऊन बाळाला कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.