शाळेची घंटा वाजणार; काय आहे शिक्षण विभागाची नियमावली?

school
schoolesakal
Updated on

मुंबई: एक डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाची नवी नियमावली आता जाहीर झाली आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी तर दोन बाकांमध्ये सहा फुटांचं अंतर असेल, असे नियम या नव्या नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहेत. पहिली ते सातवीचे वर्ग एक डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाने ही नवी नियमावली जाहीर केली आहे. वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थ्यांचीच उपस्थिती बंधनकारक राहिल, असा आदेश या नियमावलीमध्ये देण्यात आला आहे.

school
खासदारांचं निलंबन 'स्क्रिप्टेड'; सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर घणाघाती आरोप

विद्यार्थ्यांसाठी वर्गात येत असताना नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे इत्यादी नियम पाळणे गरजेचं असणार आहे. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसून आल्यास त्याला नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवण्याच्या सुचनाही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच तो वर्ग बंद करुन तिथे निर्जंतुकीकरण पार पाडण्यात यावं, अशा प्रकारच्या देखील सुचना यामध्ये आहेत. यासोबतच शिक्षकांचं देखील लसीकरण करण्यात आलेलं असावं, असंही सांगण्यात आलंय.

काय आहेत नियम?

(i) सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन १००% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. (iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.

(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांची सुध्दा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

२.२) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.

(२.३) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. २.४) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.

३. शासन परिपत्रक, दिनांक ७ जुलै, २०२१, दिनांक १० ऑगस्ट २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचना एकत्रित करुन वरील प्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ व परिशिष्ट- ब मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

४. दि. १ डिसेंबर २०२१ पासून ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व महानगरपालिका ४ क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.

५. दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. ६. वरील मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या

सूचनांचे देखील पालन करण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.