New Year: मुंबईकरांनी शहरात राहून नाही तर इतर ठिकाणी साजरा केला थर्टी फर्स्ट

पर्यटकांची घट; मुंबईच्या बाहेरील स्थळे झाली पसंत
New Year
New Yearsakal
Updated on

नववर्षाच्या पूर्वसंध्येला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. अनेक पर्यटकांनी नववर्षानिमित्त मुंबईबाहेरील स्थळांना पसंती दिल्याने राणी बागेतील पर्यटकांची संख्या घटल्याचे दिसते.


गेल्या वर्षी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २३ डिसेंबर ते १ जानेवारी या आठवडाभरात राणी बागेत एकूण एक लाख ६६ हजार ८२५ पर्यटकांनी भेट दिली. यातून ६४ लाख २७ हजार ०४१ इतका महसूल जमा झाला. नाताळच्या दिवशी ३१ हजार ४३३ पर्यटकांनी भेट दिली तर त्यातून ११ लाख ७३ हजार ७०० रुपये महसूल जमा झाला होता.

New Year
Mumbai Crime: मालमत्तेच्या वादातून पत्नीची केली हत्या तर भावावर केला हल्ला

यंदा मात्र पर्यटक आणि महसुलात काहीशी घट झाल्याचे आकडेवारीतून दिसते. यंदा २३ डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत एक लाख ३४ हजार १७९ पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली. त्यातून ४२ लाख ६४ हजार ४०३ रुपये इतका महसूल जमा झाला. पर्यटकांची संख्या ३२,६४६ तर महसूल २१ लाख ६२ हजार ६३८ रुपयांनी घटला आहे.

बोरिवलीतील नॅशनल पार्क अर्थात संजय गांधी उद्यान सुट्टीत, रविवारी धमाल करण्याचे बच्चे कंपनीचे मुंबईतील आवडते ठिकाण अशी ओळख आहे. अशात सरत्या वर्षातील शेवटच्या दिवस असलेल्या रविवार ३१ डिसेंबरला नॅशनल पार्क पर्यटकांनी बहरले होते.
नॅशनल पार्कमध्ये अनेक वन्य प्राणी, फुलपाखरे, पक्ष्यांसह विविध प्रकारची वृक्ष असे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी करतात.

.

New Year
Mumbai Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची फोनवर धमकी…; पोलिसांकडून तपास सुरू

अशात वर्षाचा शेवटच्या दिवशी बच्चे कंपनीसह पालकांनी येथे गर्दी केली होती. रविवारी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उद्यानाची सैर करताना रानमेवा काकडी, बोरे, चिंचा, कलिंगड आणि कैरीचा आस्वाद घेत भ्रमंतीचा मनसोक्त आनंद पर्यटकांनी लुटला. तसेच लायन सफारीसाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गर्दी होती. तसेच येथील तलावात बोटिंग करण्यास अनेकांनी पसंती दिली. सुगंधी उद्यान, बोटिंग, लायन सफारी, उंच टेकडी वरील कान्हेरी लेण्या, गांधी टेकडी आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली होती

New Year
Mumbai Crime: मोठ्या भावाची लहान भावांकडून हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.