अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने मंगळवारी नंतर आज बुधवारी पुन्हा रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला. यावेळी रेल्वे पोलिस आणि प्रवासी या दोघांमध्ये झटापट झाल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी 15 ते 20 प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (The railway police took action while the passengers were boarding the local in the carshed of Ambernath)
अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी अनेक लोकल सोडल्या जातात. यातील काही लोकल अंबरनाथ येथील रेल्वे यार्डात उभ्या असतात. अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकल मध्ये शिरून जागा पकडतात. त्यांनतर लोकल फलाटावर येते.(Latest Marathi News)
मंगळवारी आणि बुधवारी नेहमीप्रमाणे काही प्रवासी लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी यार्डात पोहोचले. काही प्रवाशांनी लोकलमध्ये जागा मिळवली होती. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना लोकलमधून उतरून फलाटावर जाऊन लोकल पकडण्याचे सुचवले. (Latest Marathi News)
यातील अनेक प्रवाशांनी सुरुवातील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना विरोध केला. त्यानंतर काही प्रवासी संतप्त झाले. आज बुधवारी पुन्हा रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला.(Latest Marathi News)
अंबरनाथच्या कारशेडमध्ये प्रवासी लोकलमध्ये चढत असताना रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. आर पी एफ पोलीस सकाळपासून ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी रेल्वे पोलीस अन् प्रवाश्यांमध्ये झटापट झाली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 15 ते 20 प्रवाशांना घेतले ताब्यात आहे. हा सर्व गोंधळ 7:50 च्या लोकल मध्ये झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.