नारायण राणेच्या वक्तव्याचे मुंबईत पडसाद

जूहूतील राणेंच्या निवासस्थानी शिवसैनिक-राणे समर्थक भिडले
rane
ranesakal
Updated on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपेक्षार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे याना महागात पडले. त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. मात्र राणेंच्या या वक्तव्याचे पडसाद मुंबईत उमटले. संतप्त युवा सेवेचे कार्यकर्त्यांनी नारायण राणें यांच्या जुहू येथील निवासस्थानाला धड दिली.

rane
अन्यथा राज्यभर तांडव!! भाजपची शिवसेनेला 'फायनल वॉर्निंग'

यावेळी राणे समर्थक आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यात चकमक उडाली. ती रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या मध्ये युवासेनेचे कार्यकर्ते आणि पोलिस किरकोळ जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या 50 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्याचे लक्ष्य होते जूहू तारा रोडवरील नारायण राणेंच निवासस्थानी सकाळी 10 वाजताच्या सुमारास युवा सेनेचे सरचिटणीस वरून देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवसेना कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते जमले.

जवळपास दीड हजाराचा जमाव हा नारायण राणे यांच्या जूहू इथल्या निवास्थानाकडे निघाले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. राणे यांच्या निवासस्थानात शिरण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी बेरीगेड लावले होते. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानता लावलेले बेरीगेड तोडून निवासस्थात शिरण्याचा प्रयत्न केला. बंगल्यातील भाजप कार्यकर्ते, राणे समर्थक आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यात झटापट झाली.

rane
वसई विरार : महापालिका निवडणुकीत राणेंच्या सभा उधळणार

दोन्ही बाजूने दगडफेक आणि अंडाफेक झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमुक मागवून युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यात १० ते १२ युवासेनेचे कार्यकर्ते जखमी झाले. तर ७ ते ८ महिला कार्यकर्त्यांही जखमी झाल्या. या मोर्चात सहभागी असलेल्या युवा सेनेचे सुरेश पोटले यांनी कोणीही मुख्यमंत्री उद्वव ठाकरे साहेबांबद्दल आक्षपार्ह बोलल्यास आम्ही गप्प बसणार नाही. हा मुख्यमंत्री पदाचाही अपमान आहे. अस सांगितलं

पोलिसांची बोलावलेल्या अतिरिक्त कुमुकमुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आवरण्यात यश मिळाल. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आपापल्या विधानसभा क्षेत्रातील पोलीस ठाण्यात नारायण राणेच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले.

अजून काही कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवणार

सांताकृझ पोलिसांनी भाजप कार्यकर्ते आणि 50 युवा सेनेच्या कार्यकर्त्याविरुध्द कोविड नियमांचे उल्लघंन करण्याचा आणि भारतीय दंड सहितेनुसार विविध गुन्हे नोंदवले आहे. या ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेज, सोशल मिडीया आणि न्यूज चॅनेलवर प्रसारित झालेल्या व्हिडीओ तपासून या यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, त्यांच्याविरोधात पुरावा म्हणून वापरणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

rane
कल्याणमध्ये शिवसैनिकांनी फोडलं भाजप कार्यालय;पाहा व्हिडिओ

शिवसेना युवा सेना आणि भाजप कार्यकर्त्यात मधे मारहाण झाली होती परंतु लाठीचार्ज करुन पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. कार्यकर्त्यांना पांगवल. या मध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश मिळालं.-विश्वास नांगरे पाटील,सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()