Mumbai Breaking: ४० वर्षांपासून फरार वाँटेड आरोपी अखेर अटकेत

mumbai crime
mumbai crimesakal
Updated on

Mumbai Breaking: गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेल्या डोंगरीच्या एका वाँटेड आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली. सय्यद ताहेर सय्यद हासीम असे आरोपीचे नाव असून सय्यद अंडरवर्ल्ड आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी सय्यदला १९८२ मध्ये मुंबईतील न्यायलयाने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. दरम्यान, सय्यदला पॅरोल मंजूर करण्यात आला, परंतु तो तुरुंगात परतला नाही.

परिणामी न्यायालयाने त्याला १९८५ मध्ये फरारी म्हणून घोषित केले. अनेकदा शोध घेऊनही तो पोलिसांना चकवण्यात यशस्वी राहिला. सय्यदने त्याच्या कुटुंबासह डोंगरी येथील त्यांचे निवासस्थानदेखील सोडले होते.

mumbai crime
Mumbai Pune Expressway : गॅन्ट्री बसविण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग करणार ब्लॉक

काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने सय्यदविरुद्ध एका प्रकरणात स्थायी वॉरंट जारी करत डोंगरी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. सय्यद हा इराणी शिया मुस्लिम असल्याने, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो माझगाव येथील इराणी शिया स्मशानभूमीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; मात्र ही माहिती पाच वर्षे जुनी असल्याने पोलिसांना अधिक तपशिलाची गरज होती. काही आठवड्यांनंतर पोलिसांना सय्यद हैदराबादमध्ये एरागड्डा नावाच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याची माहिती मिळाली.

आरोपीचे स्थान निश्चित करण्यासाठी पोलिसांनी त्याचा फोन नंबर मिळवला. आरोपीचे स्थान कळाल्यानंतर पोलिस पथकाने आरोपीच्या आसपासच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तीन दिवस आणि रात्र सतत पाळत ठेवल्यानंतर स्थानिक बोराबांडा पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सय्यद अंडरवर्ल्ड आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता.

mumbai crime
Mumbai Crime : चालत्या रिक्षात प्रियकराकडून प्रेयसीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()