कोरोना रुग्णांची ओळख जाहीर केल्यास बहिष्काराचा धोका - हायकोर्ट

कोरोना रुग्णांची ओळख जाहीर केल्यास बहिष्काराचा धोका - हायकोर्ट
Updated on



मुंबई : कोरोना रुग्णांची नावे जाहीर करून काय साध्य होणार, असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. त्यांची नावे जाहीर झाल्यास संबंधितांना बहिष्कृत करण्याचा धोका आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.  प्रत्येकाने सुरक्षित तत्त्वे पाळल्यास त्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही, असा सल्लाही न्यायालयाने दिला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका विधी विद्यार्थी वैशाली घोळवे आणि सोलापूरमधील शेतकरी महेश गाडेकर यांनी केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानूसार कोरोना रुग्णाचे नाव जाहीर करण्यास मनाई आहे. मात्र, यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत असून साथ पसरत आहे.  नागरिकांच्या आरोग्याचा अधिकार हा गोपनीयतेच्या अधिकारापेक्षा महत्त्वाचा आहे. त्यामुळे रुग्णांची नावे अन्य व्यक्तींच्या आरोग्यासाठी जाहीर करावीत, अशी मागणी अॅड यशोदीप देशमुख यांनी याचिकादारांतर्फे केली होती. मात्र, अशी नावे जाहीर करून काय साध्य होणार आहे असा उलट सवाल न्यायालयाने याचिकादारांना केला. 

केरळ, मध्यप्रदेश, मद्रास आणि ओरीसामध्ये अशी मागणी करणाऱ्या याचिका करण्यात आल्या होत्या. मात्र, तेथील न्यायालयाने त्या फेटाळल्या, अशी माहिती सरकारच्या वतीने  अॅड. तुषार मेहता यांनी खंडपीठाला दिली. या निकालपत्रांंचा तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली. महेश गाडेकर यांनी एड विनोद सांगवीकर यांच्या मार्फत याचिका केली आहे..

समाजात बहिष्काराचा धोका नेहमीचाच
समाजात एखाद्यावर बहिष्कार टाकण्याचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे या गोष्टी प्रत्येकावर अंवलबून आहेत. हात स्वच्छ धुतले,  स्पर्श टाळला, चेहऱ्यावर मास्क लावला, सॅनिटायझर वापरल्यास किमान संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, असे खंडपीठ म्हणाले. शिवाय, अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीशी तो धडधाकट आणि लक्षणे दिसत नसल्यामुळे मास्क न वापरता बोलतो. मात्र, तो बाधितही असू शकतो. त्यामुळे आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी ,असे खंडपीठ म्हणाले.

-------------------------------------------

Edited by Tushar Sonawnae

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.