मुख्यमंत्र्यांच्या विधानांमधून मोठी संभ्रमावस्था दिसते; प्रविण दरेकर यांचा घणाघात

मुख्यमंत्र्यांच्या विधानांमधून मोठी संभ्रमावस्था दिसते; प्रविण दरेकर यांचा घणाघात
Updated on

मुंबई ः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह मार्फत जनतेशी साधलेल्या संवादातून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. कारण ते फक्त वक्तव्ये करतात, कृती मात्र कुठे दिसत नाही, तसेच त्यांच्या विधानांमधून त्यांची संभ्रमावस्था दिसते अशी घणाघाती टिका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. 

मंदिरे उघडण्याची मागणी होत असताना, एका बाजूला मदिरालये उघडली जात आहेत. पण सरकार मंदिरे उघणार नाहीत असे मुख्यमंत्री सांगत आहे. यावरुन ठाकरे यांचे बदललेले वैचारिक स्वरुप राज्यातील जनतेसमोर आले आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला हलवली, उपनगरी रेल्वे सुरु करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही, एकीकडे जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची असे म्हणायचे आणि माझे  कुटुंब माझी जबाबदारी अशी मोहीम चालवून पुन्हा ती जबाबदारी जनतेवरच ढकलायची, असे करून उद्धव ठाकरे आपली संभ्रमावस्थाच दाखवून देत आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. 
  
जीवनचक्र सुरु होण्यासाठी मुंबईच्या उपनगरी गाड्या सुरु होणे महत्त्वाचे आहे. कारण आज कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने लोक मरणार की काय अशी परिस्थीती आहे. एकीकडे अनलॉकमध्ये सरकार सर्व बाबी सुरु करीत असतानाच तेथे लोकांना पोहोचता यावे यासाठी उपनगरी गाड्या सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. यावरुन जनतेबाबत त्यांची संवेदनशीलता किती कमी आहे, हेच दिसून येते अशी टिकाही दरेकर यांनी केली. 

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. पण अतीवृष्टीमुळे पिके उध्वस्त झालेल्या शेतांचे अजून पंचनामेही केले नाहीत, मदतीची तर गोष्टच सोडा. मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलविली. पण सारखे असे होत असताना प्रकल्पावर जो खर्च झाला आहे, त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल दरेकर यांनी केला. तसेच भांबावलेल्या अवस्थेत प्रकल्पाविषयी भूमिका घेऊ नका तर वस्तुस्थितीवर घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.