एकनाथ शिंदे थांबा, 'शिवसेना बाळ ठाकरे' नावाचा एक पक्ष पंजाबमध्ये आहे

shivsena bal thackeray
shivsena bal thackerayesakal
Updated on

एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला गोंधळ या सगळ्याची चर्चा आता देशभरात होत आहे. शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठा धक्का पक्षाला बसला आहे. यामुळे सेनेसोबतच पर्यायाने महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने देशभरात बैठका सुरू आहेत. (Maharashtra Politics)

भाजपच्या गोटातही खलबतांना सुरुवात झाली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला. यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा पेच आता वाढला आहे. दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे. त्याआधीच शिंदे गटाने त्यांच्या नव्या गटाचं नाव ठरवलंय. यासंबंधी संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार आहे.

शिंदे गटाचं नाव ठरलं, अस्तित्वाची लढाई कायम

एकनाथ शिंदे यांचा गट वारंवार खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली. यानंतर खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न उपस्थित होतो. आज संध्याकाळी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', असं या नव्या गटाचं नाव असणार आहे. पक्ष कोणाचा ही लढाई यामुळे होणार असं स्पष्ट झालं आहे.

shivsena bal thackeray
Maharashtra Political Crisis : शिवसेनेला 'वसंतसेना' असं का म्हटलं जायचं?

एका बाजूला हा सर्व वाद सुरु आहेच मात्र दुसरीकडे शिवसेना बाळ ठाकरे नावाचा आणखी एक पक्ष असल्याचं देखील समोर येतंय. हा पक्ष महाराष्ट्रात नाही तर तो आहे पंजाब मध्ये.

ऐंशीच्या दशकात शिवसेनेनं हिंदुत्व स्विकारलं आणि पक्ष मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात पसरला. पुढे बाबरी मशिदीच्या पतनावेळी शिवसेनेची लोकप्रियता उत्तर भारतात देखील पसरली. अनेक कार्यकर्ते पक्षात आले. यातच एक नाव होत पवनकुमार गुप्ता.

मूळच्या जम्मूमधल्या पवन गुप्ता यांनी बाळासाहेबांची रोखठोक भाषणं आणि आक्रमक हिंदुत्वाचा प्रेमात पडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना वाटत होतं शिवसेना आपला मराठी माणसाचा मुद्दा बाजूला ठेवून देशभरात निवडणूक लढवेल. जम्मू काश्मीर शिवसेनेचं नेतृत्व हातात घेऊन मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न देखील पवन गुप्ता यांनी पाहिलेलं. पण शिवसेना महाराष्ट्रातील राजकारणाच्या बाहेर पडूच शकली नाही.

अखेर २००५ साली पवनकुमार गुप्ता यांनी शिवसेना हिंदुस्तान नावाचा एक पक्ष स्थापन केला. या पक्षाचं जम्मू काश्मीर बरोबर पंजाब हरियाणा या राज्यात देखील अस्तित्व होतं. पण पुढे या पक्षाला देखील फुटीचा शाप लागला. विशेषतः पंजाब मध्ये शिवसेना या नावाच्या जवळपास दोन डझन संघटना आहेत.

यातच आहे शिवसेना बाळ ठाकरे.

shivsena bal thackeray
शिवसेनेला धडक देणाऱ्या एकनाथ शिंदेंची संपत्ती...

पंजाब मध्ये सर्वात शक्तिशाली आणि आक्रमक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना बाळ ठाकरे या पक्षाचं नेतृत्व योगराज शर्मा यांच्याकडे आहे. पंजाबमध्ये शीख समाजातील अतिरेकी विचाराच्या खलिस्तानी चळवळीविरुद्ध हिंदुत्ववादी विचारांचे तरुण आक्रमक झाले होते. याच तरुणाईला शिवसेना बाळ ठाकरे या पक्षाने आकर्षित करून घेतले आहे. २०१४ साली या पक्षाने राज्यातील लोकसभेच्या सर्व म्हणजेच १३ जागा लढवल्या.

गेल्या वर्षी देखील त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र अजूनही यश मिळालं नाही.

आजही शिवसेना बाळ ठाकरे हा पक्ष रस्त्यावरच्या लढाईसाठी सर्वात पुढे असतो. गेल्यावर्षी देखील खलिस्तानवादी चळवळी विरुद्ध झालेल्या दंगलीत या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली होती.अनेकांचे खून देखील झाले. पुढे काँग्रेसकच्या शासनात या पक्षाच्या नेत्यांना सरकारी सुरक्षा देण्यात आली होती. कोरोनाच्या काळात लोकांना मदत करण्यापासून ते विविध आंदोलनात हा पक्ष पुढे असतो मात्र अजूनही त्यांना निवडणुकीत विजय मिळू शकलेला नाही. मूळ शिवसेनेपासून हा पक्ष जरी दूर असला तरी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरच आम्ही चालतो असं योगराज शर्मा यांचं असं म्हणणं आहे. आजही त्यांच्या सभांच्यावेळी स्टेजवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावलेले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.