"राज्यपाल-सरकारमध्ये सुसंवाद नाही; कोश्यारींना केंद्रानं परत बोलवावं"

प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांची मागणी
Naseem-Khan-Congress
Naseem-Khan-Congresssakal media
Updated on

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Maharashtra government) कारभारात अडथळे आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) व सरकार यांच्यात सुसंवाद (Interaction) राहिला नसल्याने राज्यपालांना केंद्राने (central government) परत बोलवावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे (congress) कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem khan) यांनी केली आहे. (There is no interaction between governor and Maharashtra government says congress leader Naseem khan)

Naseem-Khan-Congress
नकोशी पाॅलिसी नागरिकांच्या माथी; कंपन्यांच्या नावे फोन करून फसवणूक

राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर खान यांनी जोरदार टीका केली आहे. कोश्यारी हे संवैधानिक पदावर असूनही एका राजकीय पक्षाचे नेते असल्यासारखे वागत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात राजभवनच्या माध्यमातून सातत्याने अडथळे आणले जात आहेत. लोकनियुक्त सरकार व राजभवन यांच्यात सुसंवाद दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना परत बोलवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजभवनने विनाकारण पेच निर्माण करुन ही निवडणूक होऊ दिली नाही. सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती राज्यपालांना दिली होती. तरीही राजभवनकडून विनाकारण सबबी पुढे करण्यात आल्या. अकरा महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त असल्याने सरकारने निवडणूक घेण्याची भूमिका घेतली होती. तरीही राजभवनने प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने निवडणूक होऊ शकली नाही. सरकारच्यावतीने राज्यपालांचा योग्य तो सन्मान राखला जात आहे. तरीही राजभवनकडून मात्र सरकारला सहकार्य केले जात नसल्याचे चित्र आहे.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्नही राजभवनकडून जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. राज्य सरकारने बारा सदस्यांच्या नावांची शिफारस करून एक वर्ष उलटून गेले तरीही त्यावर राजभवनकडून निर्णय घेतला जात नाही. विरोधीपक्ष भाजपाकडून प्रत्येक घटनेत राजभवनचा वापर केला जात असून राज्यपाल त्यांच्या राजकीय खेळीला बळी पडत आहेत. राजभवनकडून समांतर सरकार चालवले जात असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्यांना या जबाबदारीतून केंद्राने मुक्त करावे, असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()