लॉकडाऊन असेल, पण पोटाला कुलुप कसे लावणार? अनेकांनी शोधला वेगळा मार्ग

लॉकडाऊन असेल, पण पोटाला कुलुप कसे लावणार? अनेकांनी शोधला वेगळा मार्ग
Updated on

मुंबई ः कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आले आणि आता लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर जगण्याचा प्रश्न झाला. मात्र सर्वांनी हार मानली नाही, काहींनी आपण काय करु शकतो हा विचार करुन शोध सुरु केला आणि त्यातील काहींना यशही आले.

मुंबईच्या उपनगरातील एक दाम्पत्य इव्हेंट मॅनेजमेंट करीत होते. सार्वजनिक कार्यक्रमच बंद झाल्याने इव्हेंट मॅनेजमेंटची आवश्यकता नाही. कधी सुरु होईल याची कल्पना नसल्याने दोघांवर बेकारीची पाळी आली. त्यांनी घरी बसण्याऐवजी कांदे बटाटे विकण्यास सुरुवात केली. आता पोटभरण्याएवढे मिळते असे त्यांनी सांगितले.

 उपनगरातील अनेक रिक्षा चालकांनी भाजी विकण्यास सुरुवात केली. रिक्षातून होलसेल मार्केटमधून भाजी घेऊन घरापर्यंत ती नेण्याचे काम सुरु केले. पश्चिम उपनगरातील दोघांनी घराजवळ कारच्या शोरुममध्ये माणसे नाहीत हे पाहिले. ते एका कंपनीत कारकूनाचे काम करीत होते. लॉकडाऊनमुळे कंपनीत काम नाही. पगार मिळण्याची वानवा आहे. त्यामुळे त्यांनी त्या कारच्या शोरुममध्ये कार सफाई करण्यास सुरुवात केली आहे. 
मीरा खोसला यांची कहाणी काहीशी अशीच आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी केलेले पदार्थ त्यांच्या मैत्रिणींना, आप्तेष्टांना खूप आवडत असत. त्यानी दिवाळी तसेच सणांच्यावेळी काही ऑर्डर घेण्यासही सुरुवात केली होती. त्यांनी आपले घर बदलले. संपर्क तुटला आणि कामाचे स्वरुपही बदलले. मात्र कोरोनामुळे सर्व परिस्थितीच बदलली. 

पतीचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी होती. कोरोनामुळे नवा बिझनेस बंद पडला होता.  त्यांनी काही वर्षापर्यंत दिवाळीच्यावेळी खाद्य पदार्थ घेणाऱ्यांशी संपर्क साधला. त्यातूनच रोज ब्रेकफास्टही देण्याची संकल्पना समोर आली. खाद्यपदार्थ चांगले होत असल्याने त्यांच्या कौशल्याचा प्रसार झाला. आता त्या सकाळी आपली गाडी घेऊन बाहेर पडतात. आपल्या ग्राहकांच्या बिल्डिंगजवळ पोहोचल्यावर त्यांना फोन करतात. ही सेवा पाहून ग्राहक वाढत आहेत आणि मागणीही. अनेक नंबर जपून ठेवल्याच्या सवयीचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.